Breking News
अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागूनाविण्यपूर्ण उपक्रमांद्वारे जादूटोणा विरोधी कायद्याची प्रचार, प्रसिद्धी कराविषमुक्त अन्नासाठी सेंद्रिय शेतीचा अवलंब गरजेचा- सभापती किरण तावरेविकसित भारत-रोजगार व आजिविका हमी अभियान (ग्रामीण) योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ

‌‘नादब्रह्मांजली‌तून उस्ताद गुलाम रसूल खाँसाहेब यांना मानवंदना

‌‘नादब्रह्मांजली‌तून उस्ताद गुलाम रसूल खाँसाहेब यांना मानवंदना

गोखलेनगरमधील कलाछाया कल्चरल सेंटर येथे सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन

marathinews24.com

पुणे – तबला वादनातील फारुखाबाद घराण्याची परंपरा यशस्वीरित्या पुढे नेण्यात बहुमोल योगदान देणारे मरहूम उस्ताद गुलाम रसूल खाँसाहेब यांच्या पुण्यतिथीनिमित्त शिष्य परिवारातर्फे ‌‘नादब्रह्मांजली‌’ गायन-वादनाच्या कार्यक्रमातून सांगितीक मानवंदना अर्पण करण्यात आली. गोखलेनगरमधील कलाछाया कल्चरल सेंटर येथे सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये कोथरुडकर वारकऱ्यांसाठी भवन – सविस्तर बातमी 

सलीम अख्तर यांचे शिष्य देवेंद्र भावे यांच्या एकल तबला वादनाने झाली. त्यांनी सुरुवातीस तीन तालमध्ये पेशकार, कायदे, रेले सादर केला. त्यानंतर पेशकार आणि द्रुतलयीत गत आणि चक्रदार सादर केले. विश्वास जाधव यांचे शिष्य जितेश झंवर यांनी तबला वादनाची सुरुवात तीन ताल सादर करून केली. यात तुकडे, कायदे, रेले तसेच उ. अमीर हुसैन खाँ, उस्ताद जहाँगीर खाँ यांच्या रचना प्रभावीपणे सादर केल्या. तसेच उस्ताद फैय्याज हुसेन खाँ यांची शिष्या युवा व्हायोलिनवादक श्रुती राऊत हिच्या वादनाने मैफलीत रंग भरले. तिने वादनाची सुरुवात पुरिया धनाश्री या रागाने केली. ‌‘पायलिया झंकार मोरी‌’ या तीन तालातील रचनेने सादरीकरणाची सांगता केली.

मैफलीचा कळसाध्याय ठरले ते किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक अर्शद अली खान यांचे सादरीकरण. त्यांनी आपल्या सादरीकरणाची सुरुवात पुरिया कल्याणमधील विलंबित तालातील ‌‘आज सोबन‌’ या रचनेने केली. त्यानंतर द्रुत तराणा ऐकविला. ‌‘कारी बदरिया छायी‌’ ही गौड मल्हार रागातील बंदिश सादर केल्यानंतर ‌‘मोरे आए कुंवर कन्हाई‌’ ही बंदिश ऐकविली. कलाकारांना सलीम अख्तर (तबला) गंगाधर शिंदे (संवादिनी) यांनी समर्पक साथसंगत केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायरा कुरेशी यांनी केले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×