Breking News
आकाशवाणी पुणे केंद्रावर ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६’ विषयावर विशेष मुलाखत प्रसारितपुण्यातील मंदिरांना मिळणार नवी ओळखशेतकरी कर्जमुक्तीसाठी नैसर्गिक शेती अभियान ठरत आहे मैलाचा दगडअटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची ७४ लाखांची फसवणूकगुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाची ५५ लाखांची फसवणूकपुण्यात फरार गुंडाच्या बेकायदा हाॅटेलवर बुलढोझरबळीराजाला मोठा दिलासा; शेतीकामासाठी माती, मुरूमावरील रॉयल्टी रद्दराज्य शासनाचा शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा निर्धार – विशेष लेखमहाकर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना दिलासा, लाभ मिळेपर्यंत व्याज आकारू नयेतखाजगी कृत्रिम रेतन तंत्रज्ञांना विविध सेवांसाठी प्रोत्साहनपर अनुदान लागू

पुण्यात दोन कोटींची फसवणूक; कर्नाटकातून सायबर चोरटे अटकेत

पुण्यात दोन कोटींची फसवणूक; कर्नाटकातून सायबर चोरटे अटकेत

सायबर गुन्हे शाखेने चोरट्यांना बेळगाव परिसरातून केली अटक

marathinews24.com

पुणे – दोन कोटींची फसवणूक प्रकरणात कर्नाटकातील सायबर चोरट्यांना सायबर गुन्हे शाखेने अटक केली. अजय रामविलास यादव (वय २२), सलमान गौस मोहियुद्दीन अजनाल (वय ३२, दोघे रा. कर्नाटक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. यादव आणि अजनाल यांनी एका नामांकित कंपनीच्या बोधचिन्हाचा वापर समाज माध्यमातील खात्यात केला होता. त्याद्वारे यादव आणि अजनाल हे कंपनी ग्राहकांशी संपर्क साधत होते. पैसे थकले असून, तातडीने पैसे जमा करा, असा संदेश ते पाठवित होते. संदेशबाबत खातरजमा न करता अनेकांनी आरोपींच्या खात्यात पैसे जमा केले. चोरट्यांच्या खात्यात १ कोटी ९५ लाख रुपये जमा करण्यात आली होती. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात माहिती-तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हडपसरमध्ये मजुरांच्या वसाहतीत आग – सविस्तर बातमी 

तांत्रिक तपासात बँक खाते कर्नाटकातील बेळगाव भागातील एका बँकेतील असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सायबर पोलिसांच्या पथकाने दोघांना बेळगाव परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून तीन मोबाइल संच, बँकेची खातेपुस्तिका, डेबिट कार्ड असा मुद्देमाल जप्त केला. आरोपींनी अशा पद्धतीने फसवणुकीचे आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. नागरिकांनी समाज माध्यमातून पाठविण्यात येणाऱ्या संदेशाबाबत खातरजमा करुन व्यवहार करावेत. काही संशयास्पद आढळून आल्यास त्वरीत सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यत आले आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, आर्थिक आणि सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, पोलीस निरीक्षक संगीता देवकाते, उपनिरीक्षक सुशील डमरे, संदीप कणसे, प्रवीणसिंग राजपूत, राजूदास चव्हाण, अमर बनसोडे, शीतल डांगरे, अनिकेत भिंगारे यांनी ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×