सायबर चोरट्यांकडून दोघांची १६ लाखांची फसवणूक

सायबर चोरट्यांकडून दोघांची १६ लाखांची फसवणूक

खराडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – गॅस पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्यांकडून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. वेगवेगळ्या घटनेत ज्येष्ठ महिलेसहसह दोघांची १६ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. खराडी भागातील ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी ११ लाख ९४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याबाबत ७२ वर्षीय महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

अफवांवर विश्वास ठेऊ नका; पुणे पोलिसांचे आवाहन – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक महिला मूळच्या मुंबईतील अंधेरी भागातील आहेत. सध्या त्या खराडी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी ११ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. पाईपद्वारे गॅस पुरवठा वितरित करणाऱ्या कंपनीतून बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केले. गॅस देयक थकीत आहे. थकीत देयक न भरल्यास गॅस पुरवठा खंडीत करण्यात येईल, अशी भीती चोरट्यांनी त्यांना दाखविली. चोरट्यांनी त्यांना थकीत गॅस देयक एपीके फाईलच्या माध्यमातून पाठविले. संबंधित एपीके फाईल उघडल्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली.

या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी महिलेच्या बँक खात्यातून ११ लाख ९४ हजार रुपये लांबविले. खात्यातून पैसे चोरीला गेल्यानंतर महिलेने खराडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण तपास करत आहेत.

सायबर चोरट्यांनी विमाननगर भागातील एकाची सायबर चोरट्यांनी ५ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ४५ वर्षीय नागरिकाने विमानतळ पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सायबर चोरट्यांनी तक्रारदाराच्या मोबाइल क्रमांकावर १० फेब्रुवारी थकीत गॅस देयकबाबतचा संदेश पाठविला. थकीत गॅस देयक एपीके फाईलच्या माध्यमातून पाठविण्यात आले. ही फाईल उघडताच सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यातून पैसे चोरले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शेळके तपास करत आहेत. गेल्या आठवड्यात अशाच पद्धतीने सायबर चोरट्यांनी शिवाजीनगर भागातील एकाची फसवणूक केली होती.

गॅस, वीज पुरवठा खंडीत करण्याची भीती दाखवून शहरात फसवणुकीचे प्रकार वाढले आहे. एपीके फाईलच्या माध्यमातून चोरटे गॅस, वीज देयक, तसेच वाहतूक नियमभंगाचे चलन पाठवितात. नागरिकांनी सायबर चोरट्यांच्या बतवाणी, तसेच संदेशाकडे दुर्लक्ष करावे. खातरजमा करुन सर्व व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×