Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

शहरात वेगवेगळ्या अपघातात ज्येष्ठ नागरिकासह दोघांचा मृत्यू

पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू

धायरी, नगर रस्ता भागात अपघाताच्या घटना

marathinews24.com

पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात एका ज्येष्ठ नागरिकसह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिंहगड रस्त्यावरील धायरी, तसेच नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात अपघाताच्या घटना घडल्या.

वैमनस्यातून फळ विक्रेत्यासह दोघांवर वार – सविस्तर बातमी

धायरीतील डीएसके विश्व रस्त्यावर टेम्पोच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश गणपत लांडगे (वय ७३, रा. केंद्रे काॅम्प्लेक्स, काका चव्हाण शाळेसमोर, धायरी) असे मृ्त्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. टेम्पो चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. लांडगे यांच्या विवाहित मुलीने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लांडगे हे ३० सप्टेंबर रोजी दुपारी बाराच्या रस्त्यावरील डीएसके विश्व सोसायटी रस्त्यावर असलेल्या गणपती मंदिर परिसरात बागकाम करत होते. त्यावेळी भरधाव टेम्पोने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या लांडगे यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या लांडगे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस कर्मचारी एस. के. भापकर तपास करत आहेत.

नगर रस्त्यावरील लोणीकंद भागात रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा भरधाव मोटारीच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना २२ ऑक्टोबर रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली. तोयाबहाद्दुर किनबहाद्दुर थापा (वय ४८, सध्या रा. लोणीकंद) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. थापा हे हाॅटेल कामगार आहेत. २२ ऑक्टोबरला दुपारी चारच्या सुमारास थापा लोणीकंद परिसरातून निघाले होते. दुपारी चारच्या सुमारास चंद्रमा हाॅटेलसमोर रस्ता ओलांडणाऱ्या थापा यांना भरधाव मोटारीने धडक दिली. अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पसार झालेल्या मोटार चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक विजया वंजारी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×