२ किलो गांजासह दोघांना अटक
marathinews24.com
पुणे – गांजा विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विराेधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडून २ किलो गांजा, मोबाइल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटी परिसरात ही कारवाई केली. अरमान रमजान खान (वय २३, रा. जाधवनगर, नांदेड फाटा, सिंहगड रस्ता), लकी गौरव आनंद (वय १९, रा. चव्हाण आळी, धायरी, सिंहगड रस्ता) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पुणे : दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई – सविस्तर बातमी
गांजा विक्री करण्यासाठी खान आणि आनंद हे नांदेड सिटी परिसरातील गोसावी वस्तीजवळ थांबेल होते. त्यांच्याकडे गांजा असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून दोन किलो ४९० ग्रॅम गांजा, प्लास्टिक पिशव्या, मोबाइल संच असा ५४ हजार ८०० रुपयांचा गांजा जप्त केला. आरोपींनी गांजा कोठून आणला, तसेच कोणाला विक्री करण्याच्या तयारीत होते ? यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे, मारुती पारधी, सचिन माळवे, संदीप शिर्के, प्रवीण उत्तेकर, सुजीत वाडेकर, रेहाना शेख यांनी ही कारवाई केली.