Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

पर्वती गावात वडाचे झाड कोसळून दोन महिला जखमी

पर्वती गावात वडाचे झाड कोसळून दोन महिला जखमी

अग्निशमन दलाच्या जवानांनी फांद्याखाली अडकलेली वाहने काढून रस्ता केला मोकळा

marathinews24.com

पुणे – शहरातील पर्वती गावात वडाचे झाड कोसळून दोन महिला जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. झाडाच्या फांद्या पडल्याने रिक्षा, एक दुचाकी, तीन मोटारी अडकल्या होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी फांद्याखाली अडकलेली वाहने काढून रस्ता वाहतुकीस मोकळा करुन दिला.

दुर्घटनाग्रस्त इमारतीचा धोकादायक भाग हटविण्याचे काम वेगाने सुरू – सविस्तर बातमी 

पर्वती गावातील भागवत हाॅल येथे जुने वडाचे झाड आहे. झाडाचा विस्तार मोठा आहे. शुक्रवारी (१० जुलै) सायंकाळी सहाच्या सुमारास वडाचे झाड काेसळले. तेथून निघालेल्या दोन महिलांच्या अंगावर फांदी पडल्याने त्या जखमी झाल्या. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पाेहोचेपर्यंत नागरिकांनी दोन महिलांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जनता वसाहत केंद्रातील अधिकारी अमोल कर्डेकर, निलेश माने, वळवी, निरंजन पवार, ऋषीकेश बिबवे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले.

‘झाडाची फांदी रिक्षा, दुचाकी, मोटारीवर पडली होती. फांदी खाली अडकलेली वाहने, तसेच फांद्या बाजूला काढण्यात आल्या. त्यानंतर रस्ता वाहतुकीस खुला करुन देण्यात आला. या घटनेत दोन महिलांना दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले’, अशी माहिती अग्निशमन दलातील अधिकारी अमोल कर्डेकर यांनी दिली. शहरात गेल्या आठवड्यापासून संततधार पाऊस सुरू होता. १ ते ८ जुलै या कालावधीत शहरातील वेगवेगळ्या भागात २७० झाडे कोसळली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. गेले दोन दिवस पावसाने उघडीप दिली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पर्वती गावात जुने वडाचे झाड कोसळून दोन महिला जखमी झाल्या.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×