Breking News
हडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापरपुण्यात दुचाकींच्या सायलेन्सरमध्ये फेरफार; २७४ दुचाकी चालकांविरुद्ध कारवाई

दुर्घटनाग्रस्त इमारतीचा धोकादायक भाग हटविण्याचे काम वेगाने सुरू

मोशी कचरा डेपो दुर्घटना : इमारतीत अडकलेल्या ७ जणांचा मृत्यू; एकाचा अद्यापही शोध सुरू

मोशी कचरा डेपो दुर्घटना

marathinews24.com

पुणे – मोशी कचरा डेपो येथे दुर्घटनाग्रस्त झालेल्या इमारतीत अडकलेल्या सुमारे ८ नागरिकांपर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) यांच्या मार्गदर्शनाखाली बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. सध्या इमारतीचा धोकादायक आणि कोसळण्याची शक्यता असलेला भाग नियंत्रित पद्धतीने हटविण्याचे काम सुरू असून, त्यानंतर इमारतीत जवानांना सुरक्षितपणे प्रवेश करता यावा यासाठी आवश्यक मार्ग तयार करण्यात येत आहे.

विवाहित महिलेचा छळ; गरम भाजीची कढई फेकून मारली – सविस्तर बातमी 

दुर्घटनेमुळे इमारतीचा एक संपूर्ण भाग कोसळला असून उर्वरित संरचना अत्यंत अस्थिर अवस्थेत आहे. विशेषतः इमारतीचा पाया मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्याने संपूर्ण संरचनेच्या स्थिरतेवर परिणाम झाला आहे. त्यामुळे कोणतीही घाई न करता प्रत्येक टप्प्यावर संरचनात्मक सुरक्षिततेचा विचार करून बचाव मोहीम राबविण्यात येत आहे.

एनडीआरएफच्या तांत्रिक पथकाच्या मार्गदर्शनाखाली ब्रेकर मशिनच्या सहाय्याने इमारतीचा धोकादायक भाग नियंत्रित पद्धतीने पाडण्यात येत आहे. त्यानंतर निर्माण होणारा बांधकामाचा राडारोडा जेसीबी, पोकलेन आणि इतर यंत्रसामग्रीच्या मदतीने हटविण्याचे काम सुरू आहे. धोकादायक भाग पूर्णपणे हटविल्यानंतर इमारतीवरील अतिरिक्त ताण कमी होऊन उर्वरित संरचना अधिक स्थिर होण्यास मदत होणार आहे.

सध्या इमारतीत प्रवेश करण्यासाठी उपलब्ध असलेला मार्ग अत्यंत अरुंद आणि धोकादायक आहे. अशा परिस्थितीत जवानांना आत पाठविणे त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जोखमीचे ठरू शकते. त्यामुळे प्रथम इमारतीची स्थिरता सुनिश्चित करून त्यानंतरच जवानांना सुरक्षितपणे आतमध्ये प्रवेश देता येईल, अशा पद्धतीने संपूर्ण बचावकार्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एनडीआरएफ, महापालिका आणि पीएमआरडीए अग्निशमन दल, पोलीस दल, आपत्ती व्यवस्थापन दल तसेच इतर संबंधित यंत्रणा परस्पर समन्वयाने बचावकार्य राबवत आहेत. घटनास्थळी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि तांत्रिक साधने उपलब्ध ठेवण्यात आली असून प्रत्येक निर्णय प्रत्यक्ष परिस्थितीचा सातत्याने आढावा घेऊन घेतला जात आहे.

याबाबत माहिती देताना एनडीआरएफचे कमांडंट प्रवीण धट्ट म्हणाले, सध्या आमचे प्राधान्य इमारतीचा धोकादायक भाग नियंत्रित पद्धतीने हटवून संरचना शक्य तितकी स्थिर करणे हे आहे. त्यानंतर जवानांना सुरक्षितपणे आतमध्ये प्रवेश करण्यासाठी आवश्यक मार्ग उपलब्ध होईल. बचावकार्यात कोणतीही जोखीम न घेता प्रत्येक टप्प्यावर अत्यंत काळजीपूर्वक आणि नियोजनबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्यात येत आहे.

महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी हे घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), अग्निशमन विभाग, पोलीस प्रशासन तसेच इतर संबंधित यंत्रणांशी ते नियमित समन्वय साधत असून, प्रत्यक्ष परिस्थितीचा आढावा घेत आहेत. बचावकार्यात कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि तांत्रिक सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत.

दुर्घटनाग्रस्त इमारतीची सद्यस्थिती अत्यंत अस्थिर असल्यामुळे बचावकार्य अत्यंत सावधगिरीने आणि तांत्रिक पद्धतीने राबविण्यात येत आहे. अडकलेल्या नागरिकांपर्यंत शक्य तितक्या लवकर पोहोचणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट असले, तरी कोणतीही अतिरिक्त जोखीम न घेता प्रत्येक टप्प्यावर संरचनात्मक सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात आहे. धोकादायक भाग हटवून इमारत स्थिर करण्याचे काम वेगाने सुरू असून, त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांना सुरक्षितपणे आतमध्ये प्रवेश करता येईल. सर्व संबंधित यंत्रणा पूर्ण क्षमतेने आणि समन्वयाने कार्यरत असून बचावकार्याला आवश्यक ती सर्व यंत्रसामग्री, मनुष्यबळ आणि तांत्रिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.

-डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×