Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

विवाहाच्या आमिषाने दोन युवतींवर बलात्कार

कोंढवा आणि हडपसर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

marathinews24.com

पुणे – विवाहाच्या आमिषाने वेगवेगळ्या घटनेत दोन युवतींवर बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी कोंढवा आणि हडपसर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

पुण्यात गुंडाने बांधलेले अवैध वारकरी भवन जमीनदोस्त – सविस्तर बातमी

विवाहाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी एकाला अटक केली आहे अनिकेत राकेश निकाळजे (वय २१, रा. एसआरए वसाहत, कमेला, कोंढवा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत युवतीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती अल्पवयीन आहे. आरोपी निकाळजे आणि युवतीची ओळख झाली होती. युवतीला विवाहाचे आमिष दाखवून त्याने जाळ्यात ओढले. त्यानंतर युवतीवर त्याने वेळोवेळी बलात्कार केला. युवतीने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने युवतीला धमकावले. घाबरलेल्या युवतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

विवाहाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार केल्याची आणखी एक घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी अभिषेक सरक (रा. सिद्धीविनायक सोसायटी, घुलेनगर, मांजरी, हडपसर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरक याने युवतीला विवाहाचे आमिष दाखविले होते. त्याने तिच्यावर बलात्कार केला. युवती गर्भवती झाली. तिने विवाहाबाबत त्याच्याकडे विचारणा केली. त्याने उडवाउडवीचे उत्तरे दिली. युवतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार तपास करत आहेत.

विवाहाच्या आमिषाने एका महिलेवर बलात्कार केल्याची आणखी एक घटना उघडकीस आली आहे. याबाबत महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, रुपेश बाळू साळवे (वय ३०, रा. अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी) याला अटक करण्यात आली. आरोपी साळवेने महिलेला विवाहाचे आमिष दाखविले होते. विवाहाच्या आमिषाने त्याने महिलेवर वेळोवेळी बलात्कार केला. महिलेने विवाहाबाबत विचारणा केल्यानंतर त्याने नकार दिला. पोलीस उपनिरीक्षक काळे तपास करत आहेत.

विनयभंग प्रकरणात एकाविरुद्ध गुन्हा

महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी येरवडा पोलिसंनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. याप्रकरणी गणेश बाबू बंदारे (रा. लक्ष्मीनगर, येरवडा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेच्या घरात बंदारे शिरला. महिलेला धमकावून त्याने अश्लील कृत्य केले. महिलेने त्याला विरोध केला. तेव्हा त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक दळवी तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×