Breking News
Pune Police Crime News : बीएसनएलची केबल चोरणारा अटकेतPune Road Accident News : पुण्यात मोटारीच्या धडकेत रिक्षा प्रवासी महिलेचा मृत्यूShivajinagar House Robbery Pune : शिवाजीनगर भागात घरफोडी; पावणेतीन लाखांचा ऐवज चोरलाHadapsar Crime News Pune : पुण्यात काळेपडळ, चिंतामणीनगरमध्ये टोळक्याचा राडाAmit Shah Pune Visit : महाराष्ट्राच्या सहकार चळवळीचा वारसा देशभर पोहोचविण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील – केंद्रीय गृहमंत्री अमित शाहPune Police Crime News : सिंहगड रस्ता भागात दहशत माजविणारे सराईत तडीपारPune Mephedrone Drug Seizure : पुण्यात मेफेड्रोन विक्री प्रकरणात तिघे अटकेतBeed District News : दुष्काळ आणि जमिनीच्या वादातून तरूणाची आत्महत्याFarmer ID Registration Maharashtra : कृषी व अन्य शासकीय योजनांचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व फार्मर आयडी तातडीने तयार करावाWakdewadi Bus Stand Theft : वाकडेवाडी एसटी स्थानकात महिलेच्या सुटकेसमधून ऐवज चोरीला

लाळ खुरकत रोगाच्या निर्मुलनासाठी लसीकरण हाय प्रभावी उपाय

लाळ खुरकत रोगाच्या निर्मुलनासाठी लसीकरण हाय प्रभावी उपाय

पशुसंवर्धन विभागाचे आवाहन

marathinews24.com

पुणे – लाळ खुरकत रोग हा गाय, म्हैस, शेळी व मेंढ्यांमधील अत्यंत संसर्गजन्य विषाणूजन्य रोग असून त्याचा पशुधन उत्पादन व निर्यातीवर प्रतिकूल परिणाम होतो. या रोगाच्या नियंत्रण व निर्मूलनासाठी केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत सन 2030 पर्यंत लसीकरणाद्वारे लाळ खुरकत व सांसर्गिक गर्भपात हे दोन रोग निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या स्मृतींना मानवंदना – सविस्तर बातमी 

राज्यात 14 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर 2025 या कालावधीत लाळ खुरकत लसीकरण फेरी–7 यशस्वीपणे पार पडली असून 159 लक्ष गो व म्हैस वर्गीय पशुधनांपैकी 153 लक्ष पशुधनांना लसीकरण करण्यात आले आहे. लाळ खुरकत रोगाचे संपूर्ण निर्मूलन होण्यासाठी दर सहा महिन्यांनी लसीकरण करणे आवश्यक आहे.

त्यानुसार 13 फेब्रुवारी ते 29 मार्च 2026 या कालावधीत लाळ खुरकत लसीकरण फेरी–8 राबविण्यात येणार असून आवश्यक लस व साधनसामग्रीचा पुरवठा केंद्र शासनामार्फत करण्यात आला आहे. केंद्र शासनाच्या मानक कार्यप्रणालीनुसार पंचायती राज संस्था, शहरी स्थानिक संस्था, सहकारी दुग्ध संस्था, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक व पशुपालकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहिम राबविण्यात येणार आहे.

पशुंचे आरोग्य जपण्यासाठी, रोगप्रसार रोखण्यासाठी व पशुपालकांचे संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधून आपल्या गो व म्हैस वर्गीय पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव डॉ. रामास्वामी एन. आणि आयुक्त पशुसंवर्धन डॉ. प्रविणकुमार देवरे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×