Breking News
विषारी दारू प्रकरणानंतर उत्पादन शुल्क विभागाकडून छापेविमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजना

शिवसेनेच्या निवडणूक राज्य समन्वयकपदी वैभव वाघ यांची नियुक्ती

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ह्यांच्या आदेशाने धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षप्रमुखपदाचीही जबाबदारी

marathinews24.com

पुणे – शिवसेना मुख्यनेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पुण्यातील युवानेते वैभव वाघ यांची प्रभारी ‘निवडणूक राज्य समन्वयकपदी’ नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्षांच्या ‘राज्य कक्ष प्रमुख’ पदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे. या दोन्ही नियुक्तीचे पत्र नुकतेच पक्षाचे सचिव संजय मोरे यांच्या हस्ते देण्यात आले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेली ही नियुक्ती महत्वपूर्ण आहे.

पिंपरी-चिंचवड येथे दुचाकी वाहनांसाठी एनए नवीन मालिका सुरू – सविस्तर बातमी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे योग्य व्यक्तीला योग्य संधी आणि काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्यासाठी संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहेत. एकनाथ शिंदे यांनी आपल्या याच स्वभाव वैशिष्ट्याला अनुसरून वंदेमातरम संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष, हाडाचे गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते, निवडणूक रणनीतीकार आणि प्रसिद्ध ‘व्हायरल माणुसकी’ ह्या पुस्तकाचे लेखक वैभव वाघ यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आहे.

महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वैभव वाघ यांना पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, पिंपरी-चिंचवड, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी आणि सोलापूर या सहा महानगरपालिकांसाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शिवसेनेचा धर्मवीर आनंद दिघे नागरी सहाय्यता कक्ष हा उपक्रम सर्वसामान्य नागरिकांमध्ये चर्चेचा आणि आदराचा विषय ठरत आहे. या कक्षाचे प्रमुख म्हणून जबाबदारी मिळाल्याने त्याचा लाभ राज्यातील गोरगरीब जनतेला मोठ्या प्रमाणात होईल.

या नियुक्तीबद्दल वैभव वाघ यांनी आनंद व्यक्त करीत सांगितले की, विविध नैसर्गिक आपत्ती आणि राष्ट्रीय आपत्तींच्या वेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांना प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन काम करताना पाहत आलो आहे. त्यांच्या कामाने प्रभावित होऊन काही महिन्यापूर्वी माझ्या सहकाऱ्यांसह शिवसेना पक्ष प्रवेश केला. समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहचून त्यांना मदत मिळवून देण्याच्या माझ्या आवडीचा आणि निवडणूका व्यवस्थापनातील माझ्या अनुभवाचा पक्षासाठी सुयोग्य वापर करण्याची संधी मला मिळाली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×