काळेपडळ पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे -काळेपडळसह चंदननगर परिसरातून दुचाकींसह मोटारीची चोरी करणार्या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून एक मोटार आणि ५ दुचाकी असा १४ लाख २५ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. स्वप्नील नागनाथ व्होनमाने (वय २३ रा. लेन नं. तीन अ, गजाजनन नगर समोर, फुरसुंगी, पुणे ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वाहन चोरी प्रकरणात तपास पथकाकडून शोध घेण्यात येत होता. त्यावेळी पोलीस अंमलदार महादेव शिंदे व पोलीस अंमलदार नितीन ढोले यांना वाहन चोरट्याची माहिती मिळाली होती.
सराईताकडून गावठी पिस्तूलासह ३ काडतुसे जप्त; कोंढवा पोलिसांची कामगिरी – सविस्तर बातमी
चोरलेल्या दुचाकीसह चोरटा पाण्याच्या टाकीजवळ असताना पथकाने स्वप्नील व्होनमाने याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने ५ दुचाकी, मोटार चोरल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, एसीपी धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, दाऊद सय्यद, प्रतिक लाहिगुडे, शाहीद शेख, नासीर देशमुख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी, महादेव शिंदे यांनी केली.