अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली श्रद्धेचा अवमान नको
marathinews24.com
पुणे – श्री गणेश, हिंदू देवी-देवता आणि धार्मिक श्रद्धेविषयी आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी विद्यानंद बापट यांना मुंबई उच्च न्यायालयातील वकील प्रदीप नाईक यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. नोटीस मिळाल्यापासून ४८ तासांच्या आत लेखी स्पष्टीकरण देऊन हिंदू भाविकांची सार्वजनिक बिनशर्त माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मुदतीत समाधानकारक खुलासा न झाल्यास फौजदारीसह अन्य कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा नोटीसमधून देण्यात आला आहे.
पुण्यात एकाच दिवशी तरुणासह विद्यार्थिंनीची आत्महत्या – सविस्तर बातमी
डीजे वादानविरोधात विद्यानंद बापट यांनी भूमिका घेतली आहे. त्यांनी दिलेल्या मुलाखत, काही व्हिडिओ विविध डिजिटल माध्यमांवर प्रसारित झाले आहेत. त्यामध्ये गणेशोत्सव, हिंदू धार्मिक परंपरा आणि भगवान श्री गणेश यांच्याविषयी केलेली वक्तव्ये आक्षेपार्ह व अवमानकारक असल्याचा दावा नोटीसमध्ये करण्यात आला आहे. श्री गणेश हे कोट्यवधी हिंदूंचे आराध्य दैवत असून, वक्तव्यांमुळे धार्मिक भावना दुखावल्याचे नोटीसमध्ये नमूद आहे. ध्वनीप्रदूषण, ध्वनिक्षेपक, मिरवणुका अथवा सार्वजनिक उत्सवांबाबत कायदेशीर आणि सभ्य पद्धतीने मत मांडण्याच्या अधिकाराला विरोध नसल्याचे ॲड. नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
अभिव्यक्ति स्वातंत्र्याच्या नावाखाली धार्मिक श्रद्धा आणि आराध्य दैवतांचा अवमान करण्याचा अधिकार कोणालाही नाही, अशी भूमिका नोटीसमधून मांडली आहे. भारतीय संविधानाच्या कलम १९(१)(अ) नुसार अभिव्यक्तिस्वातंत्र्य असले तरी कलम १९(२) नुसार त्यावर वाजवी निर्बंध आहेत. कलम २५ अंतर्गत धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. त्यामुळे एका व्यक्तीच्या अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा वापर इतरांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी होऊ नये, असे नोटीसीमध्ये नमूद केले आहे.
बापट यांना पाठवलेल्या नोटीसीमधील ठळक मुद्दे
श्री गणेश यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यावबाबत लेखी स्पष्टीकरण द्यावे, हिंदू धर्म किंवा श्री गणेश यांचया अवमान करण्याचा हेतू नसल्यास तसे लेखी स्पष्टीकरण द्यावे.
धार्मिक भावना दुखावल्या गेल्याबद्दल सार्वजनिक बिनशर्त दिलगिरी व्यक्त करावी. आक्षपार्ह वक्तव्याचा सोशल मिडीयातून प्रसार होत असल्यास थांबवावे. मुळ व्हिडीओ अनएडीटेड रेकॉर्डींग, ऑडीओ, डिजीटल फाईल, सोशल मिडीया पोस्ट, मेटाडाटा व इतर इलेक्ट्रानिक पुरावे नष्ठ अथवा त्याच्याशी छेडछाड करून नयेत. ते सुरक्षित जतन करावेत. धार्मिक भावना दुखावणारी वक्तवे करू नयेत.
नोटीस मिळाल्यानंतर 48 तासात उत्तर द्यावे. स्पष्टीकरण न दिल्यास व कृती पुढे चालू ठेवल्यास, उपलब्ध व्हिडीओ, इलेक्ट्रानिक पुराव इतर सामग्रीच्या आधारे सायबर पोलिस, संबंधित पोलिस अधिकारी तसेच न्यायालयात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार फौजदारी तक्रार दाखल करण्याचा इशारा ॲड. प्रदीप नाईक यांनी दिला आहे.






















