साडेचार लाखांचे दागिने चोरून दाम्पत्य पसार
marathinews24.com
पुणे – सोसायटीत काम करणार्या मोलकरणीसह वॉचमन म्हणून असलेल्या तिच्या नवर्याने एका फ्लॅटमधील ४ लाख ५२ हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. ही घटना ५ ते १० मे कालावधीत बाणेरमधील पॅनकार्ड क्लब रोडवरील दनेट सोसायटीत घडली आहे. याप्रकरणी दाम्पत्याविरूद्ध बाणेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चक्रधन बहाद्दुर सोनार आणि सुमित्रा सोनार ( दोघेही रा. बाणेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मैत्रयी पाटील (वय ३२, रा. बाणेर ) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
वादातून भावावर केला कुर्हाडीने हल्ला, बिबवेवाडीतल घटना – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैत्रयी पाटील बाणेरमधील दनेट सोसायटीत राहायला असून, त्यांच्याकडे काही दिवसांपासून सुमित्रा सोनार घरकामाला होती. तिचा नवरा चक्रधनही त्याच इमारतीत सुरक्षारक्षक होता. त्यामुळे मैत्रयीला तिच्याबद्दल विश्वास निर्माण झाल्यामुळे तिला घरकामासाठी नियुक्त केले होते. ५ ते १० मे कालावधीत सुमित्राने घरात कोणीही नसल्याची संधी साधून मैत्रयीच्या ४ लाख ५२ हजारांची दागिने चोरी केली. त्यानंतर दोन ते तीन दिवस ती कामाला आली होती. मात्र, त्यानंतर तिने कामाला येणे बंद केल्यानंतर संशयातून मैत्रयीने कपाटातील दागिन्यांची पाहणी केली असता, ते आढळून आले नाहीत. त्यामुळे तिने मोलकरणीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोलकरीण नवरा चक्रधनसह पसार झाली होती. पोलीस उपनिरीक्षक शिवाजी राहिगुडे तपास करीत आहेत.