Breking News
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील जखमींच्या मदतीला सरसावलेपीएमपीएल बसने ६ वाहनांना उडवले, तिघे जखमीबाल विवाह रोखण्यासाठी प्रयत्न करावे- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीशाब्बास पुणे ग्रामीण पोलीस; विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून कौतुकपुण्यात अक्षय तृतीयेनिमित्त मध्यभागात वाहतूक बदलअनधिकृत बाल संस्था सुरु असल्यास कळवावे-महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडेकृषी योजनांच्या लाभासाठी ‘अँग्रिस्टॅक’ नोंदणी करणे बंधनकारकदुकानदाराला हप्ता मागितल्याप्रकरणी सराईत आरोपीला अटकस्वारगेट एसटी स्टँडसह पुणे रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटकमान्सूनपुर्व कामे वेळेत पुर्ण करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश

शाब्बास पुणे ग्रामीण पोलीस; विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडून कौतुक

कायदा सुव्यवस्थेत पुणे ग्रामीण पोलिसांचे काम उत्कृष्ठ

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासह विविध गुन्ह्यांची उकल करण्यात पुणे ग्रामीण पोलिसांचे काम उल्लेखनीय आहे. त्यासोबतच अमली पदार्थ तस्करांविरूद्ध कारवाई, दोषसिद्धीत विविध पोलीस ठाण्यांच्या प्रमुखांसह अधिकार्‍यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळेच नागरिकांसह उद्योजकांना भयमुक्त वातावरणात सुस्थितीत राहता येत असल्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी सांगितले आहे. वार्षिंक निरीक्षक अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर अधीक्षक रमेश चोपडे यांच्यासह उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित होते.

धनगराच्या पोराची थेट आयपीएस पदाला गवसणी; बिरुदेव डोने यांची संघर्ष कहाणी – सविस्तर लेख

सुनील फुलारी म्हणाले, नागरिकांच्या अडी-अडचणी सोडवून त्यांच्या प्रश्नांची उकल करण्यास पुणे ग्रामीण पोलिसांनी वेळोवेळी प्राधान्य दिले आहे. त्यामुळेच शांतता प्रस्थापित होण्यास मदत झाली आहे. दरम्यान, २०२४ मध्ये पार पडलेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांवेळी पोलिसांनी अतिशय उत्कृष्ठ नियोजन केले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोठेडी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित झाला नाही. त्यासोबतच बंदोबस्तातही पोलिसांनी अतिशय चांगली भूमिका पार पाडली आहे. तसेच पुणे ग्रामीण पोलिसांनी शिक्रापूर हद्दीतील आरणगावात जेष्ठ दाम्पत्याच्या घरावरील दरोड्यासह खूनाची उकल, हवेलीतील बांधकाम व्यावसायिक अपहरण व खूनाची उकल, सारोळा गावातील नदीपात्रातील अनोळखी खूनाची उकल, अल्पवयीन मुलींच्या खूनाची उकल, यवतमधील खूनासह दरोड्यात आरोपींना अटकाव केला आहे. त्यापार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांच्या कामगिरीचे विशेष कौतुक असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योजकांसोबत बैठक, अडीअडचणींवर चर्चा

शासनाचा १०० दिवस कामाचा कृती आराखड्याच्या अनुषंगाने रांजणगाव पोलीस ठाण्याची उत्कृष्ट ठाणे म्हणून निवड करण्यात आली. त्याअनुषंगाने हद्दीत विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी पाहणी केली. त्यानंतर परिसरातील औद्योगिक कंपन्यातील उद्योजकांसोबत बैठक पार पडली. यावेळी उपस्थित उद्योजकांना असलेल्या अडी-अचडणींवर चर्चा करण्यात आली. दरम्यान, वार्षिक निरीक्षकाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी फुलारी यांना मानवंदना दिली. त्यानंतर त्यांनी पोलीस अमलदार-अधिकार्‍यांसोबत चर्चा करून समस्या जाणून घेतल्या.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सदैव दक्ष-पोलीस अधीक्षक पंकज देशमुख

जिल्ह्यातील नागरिकांची सुरक्षितता आमच्या दृष्टीने खूप महत्वाची असून, त्यादृष्टीने वेळोवेळी उपाययोजना राबवून अमलबजावणी केली आहे. त्यासोबतच कायदा सुव्यवस्था, गुन्हेगारीचा आलेख कमी करणे, दोषसिद्धीसाठी कागदोपत्री पाठपुरावा करणे, पोलीस अमलदार ते अधिकार्‍यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासही प्रामुख्याने प्राधान्य दिले. दरम्यान, प्रत्येक ठाणे प्रमुखांसह अधिकार्‍यांनी केलेल्या मेहनतीमुळेच अनेक क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणे, गुन्हेगारीला आळा घालण्यास मदत झाली. त्याचा फायदा नागरिकांना झाल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top