Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

नऱ्हे ते रावेत उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करणार

नऱ्हे ते रावेत उड्डाणपुलासाठी पाठपुरावा करणार

नवले पूल अपघातानंतर मंत्री मुरलीधर मोहोळ यांची भेट

marathinews24.com

पुणे – शहरानजीक नवले पूल परिसरात गुरुवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघाताच्या पार्श्वभूमीवर या भागात होणारे अपघात रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाय योजना करण्याची गरज आहे. आपत्कालीन उपाय योजनासंदर्भात विविध यंत्रणांशी समन्वय साधण्यासाठी शनिवारी (१५ नोव्हेंबर) बैठकीचे आयोजन केले जाणार आहे. नऱ्हे ते रावेत (सुतारवाडीमार्गे) दम्यान उन्नत पुलाचा प्रकल्प आराखडा मंजूर झाला आहे. त्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे, अशी माहिती खासदार, केंद्रीय नागरी विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

वाहन चालकांकडून वेगमर्यादा धुडकाविण्याचे प्रकार – सविस्तर बातमी 

नवले पूल परिसरात झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातात नऊ ते दहा जण गंभीर होरपळले. अपघाताच्या घटनेनंतर मुरलीधर माेहोळ यांनी शुक्रवारी सकाळी नवले पूल परिसरात भेट दिली. आमदार भीमराव तापकीर, महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी संजय कदम यावेळी उपस्थित होते.

‘नवले पूल परिसराात यापूर्वी गंभीर अपघात घडले आहेत. त्यानंतर दरी पूल ते वडगाव बुद्रुक परिसरात होणारे गंभीर रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात आल्या. भरधाव वाहनांसाठी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली. वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी गतिरोधक पट्टीका बसविणे (रम्बलिंग स्ट्रीप), स्पीड गनची संख्या वाढविणे, बाह्यवळण मार्गावरील वळणे बंद करणे अशा उपाययोजना करण्यात आल्या. त्यानंतर या भागातील अपघातांची संख्या कमी झाली. मात्र, गुरुवारी सायंकाळी झालेल्या अपघाताच्या पार्श्वभूमीवर या भागात दीर्घकालीन उपायोजना करणे गरजेचे आहे’, असे मोहोळ यांनी नमूद केले.

मोहोळ म्हणाले, ‘नवले पूल परिसरात झालेल्या गंभीर अपघातांच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत यापूर्वी पुण्यात, तसेच दिल्लीतही बैठक झाली होती. दरी पूल ते सुतारवाडी (पाषाण), सुतारववाडी ते रावेत या ३२ किलोमीटर लांबीचा उन्नत मार्ग (एलिव्हेटेड रोड) करण्याचा निर्णय घेण्यात आहे. त्याचा आरखडा मंजूर झालाा आहे. या कामाला गती देण्यासाठी गडकरी यांची भेट घेण्यात येणार आहे.‘

‘आपत्कालीन उपायोजनांतर्गत खेड शिवापूर टोल नाक्याजवळ अवजड वाहनांच्या ब्रेकची तपासणी करण्यात येणार आहे. स्पीड गनची संख्या वाढवून भरधाव वाहनांवर कारवाई करण्यात येणार आहे. सेवा रस्त्यांचे कामे पूर्ण करण्यात येणार आहे. अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने मार्गस्थ करण्यासाठी उपायोजना करता येईल. यादृष्टीने पुणे महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, जिल्हा प्रशासन, पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणातील (पीएमआरडीए) अधिकाऱ्यांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन शनिवारी केेले जाणार आहे. या यंत्रणांमध्ये सन्मवय असणे गरजेचे आहे’, असे त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×