Breking News
फुलेप्रेमी कवीच्या कुटुंबाला तीन लाखांची आर्थिक मदतपुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी

दागिने चोरी प्रकरणी महिला गजाआड

दागिने चोरी प्रकरणी महिला गजाआड

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – भावाच्या लग्नाच्या निमित्ताने माहेरी निघालेल्या महिलेच्या पर्समधून ३ लाख ३५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना केजच्या बस स्टँडवर घडली होती. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने गंगाखेड येथून महिलेला ताब्यात घेतले आहे. या महिलेला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

घरफोडीत ३० लाखांचा ऐवज लांबविला – सविस्तर बातमी 

केज येथील शिक्षक कॉलनीमध्ये राहत असलेल्या अश्विनी गोविंद घोळवे या १ फेब्रुवारीला त्यांच्या भावाच्या लग्नासाठी लातूरात जात होत्या. माहेरी जात असताना त्या नाशिक-लातूर या बस मध्ये चढत होत्या. त्यावेळी त्यांच्या पर्सची चैन उघडून चोरट्याने १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, मोठे पट्टीचे सोन्याचे गंठण, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुमके, असे ३ लाख ३५ हजार ९८० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले होते. तपास पोलिस पथकाने परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातून संशयित महिलेला ताब्यात घेतले आहे. संशयित महिलेस ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. केज येथील अशा प्रकारच्या चोरीचे मोठे रॅकेट असल्याचा संशय असून पोलिस तपास करीत आहेत. पोलिस उपनिरीक्षक लक्ष्मण कीर्तने हे तपास करीत आहेत.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस हवालदार दिलीप गिते, पोलीस हवालदार, पोलिस हवालदार भागवत शेलार, महिला पोलीस हवालदार स्वाती मुंढे, पोलिस हवालदार मराडे यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×