Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

महिलेला जादा परताव्याचे आमिष पडले ३१ लाखांना

Crime News : गुंतवणूकीवर जादा परताव्याचे आमिष, २८ लाखांचा गंडा

शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी करीत सायबर चोरट्यांनी एका महिलेला ३१ लाखांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना ४ ते २५ नोव्हेंबर २०२५ कालावधीत शिवाजीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकासह बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फेसबुकद्वारे कर्ज मिळवून देण्याची केली बतावणी – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला शिवाजीनगरमध्ये राहायला असून, ४ नोव्हेंबरला सायबर चोरट्यांनी तिला फोन केला. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, अशी बतावणी केली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेचा विश्वास संपादित करून तिला गुंतवणूकीला भाग पाडले. ३१ लाख रूपयांची गुंतवणूक केल्यानंतर महिलेला फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तिने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे तपास करीत आहेत.

तरुणाला ११ लाख ५० हजारांचा गंडा

जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी बिबवेवाडीतील तरूणाला ११ लाख ५० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १५ ऑक्टोबर ते ३ डिसेंबर २०२५ कालावधीत घडली आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×