Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

फेसबुकद्वारे कर्ज मिळवून देण्याची केली बतावणी

Pune Cyber Fraud

तब्बल ४१ लाखांचा घातला गंडा

marathinews24.com

पुणे – फेसबुकद्वारे कर्ज मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्याने तरूणाचा विश्वास संपादित केला. त्यानंतर त्याला लिंक डाउनलोड करण्यास भाग पाडले. तरूणाचे फोटो मॉर्फ करून धमकी देत, सायबर चोरट्यांनी त्याला तब्बल ४१ लाख २० हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना ५ जून ते ३ नोव्हेंबर २०२५ कालावधीत भवानी पेठेत घडली आहे. याप्रकरणी २८ वर्षीय तरूणाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पार्टटाईम जॉबच्या नावाखाली २४ लाखांचा गंडा – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण भवानी पेठेत राहायला असून, ५ जूनला सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. सायबर चोरट्यांनी तरूणाला फेसबुकद्वारे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याला लिंक पाठवून डाउनलोड करण्यास भाग पाडले. त्यानंतर काही दिवसांनी सायबर चोरट्यांनी तरूणाचा फोटो मॉर्फ करीत धमकी दिली. अवघ्या पाच महिन्यांत तब्बल ४१ लाख २० हजार रूपये ऑनलाईनरित्या वर्ग करून घेत फसवणूक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश गित्ते तपास करीत आहेत.

तरूणाला २३ लाख ७० हजारांचा गंडा

जादा परताव्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला लिंक पाठवून डाउनलोड करण्यास भाग पाडले. याप्रकरणी सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल २३ लाख ७० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १५ मार्च ते २२ जुलै २०२५ कालावधीत भवानी पेठेत घडली आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय तरूणाने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकासह बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चेतन मोरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×