Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

महिलेचा खून करुन कचरापेटीत मृतदेह टाकला

व्हाट्सएपच्या स्टेट्समुळे पुण्यात अल्पवयीन मुलाचा निर्घुन खून

येरवडा भागातील घटना 

marathinews24.com

पुणे – महिलेला दांडक्याने बेदम मारहाण करुन तिचा दोघांनी खून केल्याची घटना येरवडा भागात घडली. आरोपींनी मृतदेह दोन ते तीन दिवस घरात ठेवला. दुर्गधी सुटल्यानंतर आरोपींनी मृतदेह लोहगाव-वाघोली रस्त्यावर असलेल्या कचरापेटीत टाकल्याचा प्रकार धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पुण्यातील आगाखान पॅलेसमध्ये चंदन चोरी – सविस्तर बातमी 

सुवर्णा (वय ४०) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. सुवर्णा फिरस्ती असून, तिचे पूर्ण नाव समजले नाही. याप्रकरणी रवी रमेश साबळे (वय ३५), त्याचे वडील रमेश रामचंद्र साबळे (वय ६५, रा. जिजामातानगर, नवी खडकी, येरवडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक संतोष शिंदे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरोपी रवी साबळे याची सुवर्णा नावाच्या महिलेशी काही दिवसांपूर्वी पुणे स्टेशन परिससरात ओळख झाली होती. १५ नाेव्हेंबरला तिला पुणे स्टेशन परिसरातून त्याने येरवड्यातील घरी आणले. किरकोळ कारणावरुन रवीचा तिच्याशी वाद झाला. त्यानंतर रवी आणि त्याचे वडील रमेश यांनी तिला घरात लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. मारहाणीत ती गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या सुवर्णाला दोघांनी रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले नाही. तिचा मृत्यू झाल्यानंतर दोघांनी दोन ते तीन दिवस मृतदेह घरात ठेवला.

मृतदेह दोन दिवस घरात ठेवल्यानंतर दुर्गंधी सुटली. आरोपींनी तिचा मृतदेहाची विल्हेवाट लावून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तिचा मृतदेह चादरीत गुंडाळून रिक्षातून लोहगाव-वाघोली रस्त्यावरील स्मशानभूमी परिसरात नेला. त्यानंतर या भागातील मोकळ्या जागेतील कचरापेटीत तिचा मृतदेह आरोपींनी टाकला. मंगळवारी (१८ नाेव्हेंबर) लोहगाव-वाघोली रस्त्यावर महिलेचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंढे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे, येरवडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रवी साबळे आणि त्याचे वडील रमेश यांनी सुवर्णाचा किरकोळ वादातनू बेदम मारहाण करुन खून केल्याची माहिती मिळाली. पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह कचरापेटीत फेकून दिल्याचे उघडकीस आले. पसार झालेल्या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक विजय ठाकर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×