Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

सेवा पंधरवड्यात महिलांचा भव्य सन्मान

सेवा पंधरवड्यात महिलांचा भव्य सन्मान

गिरीश खत्री मित्र परिवाराचा अभिनव उपक्रम

पुणे – भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात साजरा होत असलेल्या सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने कोथरुड मतदारसंघात महिलांचा भव्य सन्मान सोहळा पार पडला. हा उपक्रम गिरीश खत्री मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.

राज्यात यंदाचा गाळप हंगाम १ नोव्हेंबर पासून सुरू करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – सविस्तर बातमी 

पती राजकीय व सामाजिक कार्यात व्यस्त असताना, घराची व कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या महिलांचे योगदान समाजासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. या योगदानाची दखल घेत नवरात्रातील पावन अश्विन शुद्ध षष्ठी या दिवशी झालेल्या कार्यक्रमात भाजपाच्या महिला व युवती पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या तसेच भाजपाच्या सन्माननीय बांधवांच्या सौभाग्यवतींना गौरविण्यात आले. यावेळी समर्पित भावनेने काम करणाऱ्या पुरुष कार्यकर्त्यांचा देखील सन्मान करण्यात आला. जवळपास दोनशे महिलांचा गौरव या कार्यक्रमात करण्यात आला.

गिरीश खत्री यांनी या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “महिला या कुटुंबाच्या खऱ्या आधारस्तंभ असतात. त्या घराची जबाबदारी सांभाळत असतानाच पती व कुटुंबीयांना सामाजिक कार्यासाठी पाठबळ देतात. या त्याग आणि योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. समाजात महिलांचा सहभाग व त्यांचे योगदान अमूल्य आहे आणि त्यांच्या सन्मानाशिवाय समाजाचा खरा विकास शक्य नाही.”

या कार्यक्रमात सन्मान प्राप्त झालेल्या महिलांनी आनंद व्यक्त करत सांगितले की, अशा उपक्रमांमुळे आत्मविश्वास वाढतो, समाजातील कार्याला नवी ऊर्जा मिळते आणि आपली कदर होत असल्याची जाणीव होते. गिरीश खत्री मित्र परिवाराचा हा उपक्रम महिलांच्या सन्मानासोबतच समाजातील समता आणि ऐक्याचा संदेश देणारा ठरला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×