Breking News
Pune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्तPune Fodder Cultivation 2026 : २५ हजार एकरांवर चारा लागवडीचे नियोजन; २२० टन बियाण्यांपैकी ८० टक्के वाटप पूर्णDeveloped Maharashtra 2030 : लोकाभिमुख प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि प्रत्यक्ष क्षेत्रभेटींवर भर द्यावा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

‘दगडूशेठ’ गणपतीसमोरील अथर्वशीर्ष पठणाचा जागतिक विक्रम

ग्लोबल बुक ॲाफ एक्सलेंस, इंग्लंडमध्ये नोंद

marathinews24.com

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ऋषिपंचमीनिमित्त दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या सामुदायिक अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचा जागतिक विक्रम झाला आहे. तब्बल ३५ हजार २१५ महिलांच्या अथर्वशीर्ष पठण उपक्रमाची नोंद ग्लोबल बुक ॲाफ एक्सलेंस, इंग्लंडमध्ये झाली आहे.

महाराष्ट्रातील पर्यटकांचा देवदूत; शिवसेना भवनात साकारला अनोखा देखावा – सविस्तर बातमी

ट्रस्टच्यावतीने सुरु असलेल्या १३३ व्या वर्षीच्या गणेशोत्सवात जागतिक विक्रमाचे प्रमाणपत्र ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लंड उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट चे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांना प्रदान केले. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी म्हणाले, दरवर्षी ओम गं गणपतये नमः:… ओम नमस्ते गणपतये… मोरया, मोरया… च्या जयघोषात तब्बल ३५ हजार महिला एकत्र येत हा उपक्रम राबविला जातो. उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक गणपती बाप्पा समोर पाहायला मिळतो. यामध्ये पुण्यासह संपूर्ण जगभरातून महिला सहभागी होतात, हे याचे वैशिष्ट्य असून यावेळी स्त्री शक्तीचा जागर होत असतो. उपक्रमाचे यंदा ४० वे वर्ष असून यंदा मिळालेला हा सन्मान आनंदादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×