Breking News
‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदीराज्यातील 404 नागरिक सुरक्षित व 338 संपर्कात; प्रवास सुविधा व मदतीचे नियोजन सतर्कतेने करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देशहातमाग, स्थानिक कारागिरांसाठी केंद्र सरकारचा पुढाकारबिबवेवाडी परिसरात वैमनस्यातून तरुणावर शस्त्राने वारविवाहविषयक संकेतस्थळावरील ओळख महागातबेकायदा सावकारीतून कोट्यवधींची वसुली; तिघांविरुद्ध गुन्हा

अनैतिक संबंधातून तरुणाची विषारी ओैषध पिऊन आत्महत्या

सतत अपमानित केल्याने हडपसरमध्ये तरुणाची आत्महत्या

उत्तमनगर परिसरात घडली घटना

marathinews24.com

पुणे – अनैतिक संबधातून प्रेयसी, तसेच तिच्या मित्राने त्रास दिल्याने एका तरुणाने विषारी ओैषध प्राशन करनु आत्महत्या केल्याची घटना उत्तमनगर परिसरात घडली. तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन प्रेयसीसह तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत तरुणाच्या पत्नीने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रेयसी, तसेच तिच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आत्महत्या केलेला तरुण मूळचा अहिल्यानगरमधील शेवगाव तालुक्यातील देवटाकळी गावचा आहे. त्याची प्रेयसी ही शेवगाव तालुक्यातील आहे.

पुण्यात प्रियकराने ब्लेडने गळा चिरल्याने गंभीर जखमी तरुणीचा मृत्यू – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आराेपी हा आत्महत्या केलेल्या तरुणाचा नातेवाईक आहे. आरोपी हा आत्महत्या केलेल्या तरुणाच्या पत्नीला भेटला. ‘तुमच्या पतीवर एका तरुणीने मोहिनी घातली आहे. दोघांचे प्रेमसंबंध आहेत. तू माझ्याशी शरीरसंबंध ठेवल्यास तुझ्या पतीची तरुणीच्या पाशातून सुटका करतो’, असे आरोपीने तरुणाच्या पत्नीला सांगितले हाेते. ही बाब तिने पतीला सांगितली. त्यानंतर तरुणाने आरोपीला जाब विचारला. ‘तेव्हा तुझ्यावर जादूटोणा करतो’, अशी भीती दाखविली. आरोपी तरुणी पत्नी आणि मुलीला सोडून दे, असे सांगत होती. तरुणी आणि तिच्या मित्राच्या त्रासामुळे तरुणाने १३ एप्रिल रोजी सायंकाळी विषारी ओैषध पिऊन आत्महत्या केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×