Breking News
पुण्यातील दोन महसूल अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; जमिनीच्या हद्द निश्चितीसाठी ५० लाखांची लाच मागितलीधुमस्टाईल सोनसाखळी हिसकावणार्‍या दोघांना बेड्यापोलीस उपनिरीक्षकाच्या बहिणीचा गडचिरोलीत केला खून, पसार आरोपीला पुण्यात पकडलेखडकी पोलिसांची तत्परता आली कामी, अवघ्या ४ तासांत रिक्षा चालकाला शोधलेमराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही; सुप्रिया सुळेऑस्ट्रेलियासह पुण्यातही मानसिक व शारीरिक त्रासाचा सामना…क्रांतिवीर चाफेकर बंधूचे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादनपुरस्कार विजेत्यांनी खेळाडूंना दिशा दाखवण्याचे काम करावे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसक्रीडासह विविध क्षेत्रात महाराष्ट्राने देशाचे नेतृत्व – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णनपिंपरी-चिंचवड; दारूच्या नशेत बरळला अन खुनाची उकल झाली !

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाचा केला खून

पुण्यातील चंदननगरमधील घटनेने खळबळ

Marathinews24.com

पुणे – बहिणीची छेड काढण्याच्या कारणावरुन गेल्या एक वर्षांपासून सुरु असलेल्या वादात गाडीचालकाने कट मारल्याची भर पडली. त्यातून तिघांनी मिळून तरुणाच्या डोक्यात फरशीचा तुकड्याने वार करुन त्याचा खून केला. प्रदीप बाबासा हेब अडागळे (वय २२, रा. आभाळवाडी, वाघोली) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. चंदननगर पोलिसांनी ऋषी काकडे व त्याची आई सुनिता काकडे (रा. थिटे वस्ती, खराडी) यांना अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही घटना गुरुवारी रात्री अकरा वाजता चंदननगरमधील टाटा गार्डनजवळ घडली.

पोलीस उपनिरीक्षकाला ताब्यात घेण्यासाठी १३ जणांचे पथक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडेचा भाजीचा व्यवसाय असून, प्रदीप अडागळे याने ऋषी काकडे याच्या बहिणीची छेड काढल्यावरुन त्यांच्यात एक वर्षांपासून वाद होत होते. त्यातच गुरुवारी (दि. १७) गाडीने कट मारल्यावरुन अल्पवयीन मुलाबरोबर प्रदीप अडागळे याचा वाद झाला होता. त्याच वादातून टोळक्याने प्रदीपला चंदननगरमधील टाटा गार्डनजवळ बोलविले होते. त्यावेळी त्यांच्यात झालेल्या वादातून तिघांनी मिळून प्रदीपच्या डोक्यात फरशीच्या तुकड्याने वार करुन त्याला गंभीर जखमी केले. जखमी अवस्थेत प्रदीपला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी घटनेची माहिती मिळताच चंदननगर पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. प्रदीववर उपचार सुरु असताना शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्याचा मृत्यु झाला. त्यानुसार आता संबंधित गुन्ह्यात पोलिसांनी खुनाचे कलम वाढवले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

error: Content is protected !!
Scroll to Top