Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

गाडीला कट का मारला म्हणत तरूणाला लुटले, दोघांना अटक

पुण्यात मोबाईल चोरणार्‍याला अटक, ३५ मोबाईल जप्त

चोरट्यांना वाघोली पोलिसांनी केली अटक

marathinews24.com

पुणे – दुचाकीवर जाणार्‍या तरूणाला थांबवून गाडीला कट का मारला म्हणत चोरट्याने त्याला शिवीगाळ करत मारहाण केली. त्याच्याकडील ५५ हजारांचा मोबाइल, २० हजारांची दुचाकी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना ३ ऑगस्टला रात्री सव्वा अकराच्या सुमारास आव्हाळवाडी खराडी रस्त्यावर घडली होती. याप्रकरणी दिपक शहादेव कोटुळे (वय २२, रा. आव्हाळवाडी, वाघोली मुळ रा. राजुरी, बीड) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार दोघा चोरट्यांना वाघोली पोलिसांनी अटक केली आहे.

खासगी यु ट्युबच्या माध्यमातून पेपर फोडले – विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

तुषार गोरख चांदणे (वय २०) आणि नितीन रमेश कुसळे (वय २१ रा. आवाळवाटी, ता. हवेली ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. दुचाकीस्वार दीपक हे ३ ऑगस्टला रात्री सव्वा अकराच्या सुमारास आव्हाळवाडी खराडी रस्ता परिसरातून घरी जात होते. त्यावेळी दुचाकीस्वार दोघा चोरट्यांनी त्यांना अडवून गाडीला कट का मारला म्हणत त्यांना शिवीगाळ केली. त्यांना मारहाण करीत ५५ हजारांचा मोबाइल, दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास करीत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस उपनिरीक्षक शेंडगे तपास करीत आहेत.

शेअर ट्रेडींगमध्ये जादा नफ्याचे आमिष पडले १० लाखांना

शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळवून देण्याची बतावणी करीत सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल १० लाख २१ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना १ जानेवारी ते ११ जुलै २०२५ कालावधीत मुंढव्यात घडली आहे. याप्रकरणी ३२ वर्षीय तरूणाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकासह लिंक धारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मुंढव्यात राहायला असून, १ जानेवारीला सायबर चोरट्यांनी त्याला संपर्क साधला होता. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यामुळे विश्वास संपादित झाल्यानंतर तक्रारदाराने गुंतवणूकीला सुरूवात केली. जवळपास सात महिन्यांत तरूणाने १० लाख २१ हजारांची रक्कम संबंधित मोबाइलधारकाच्या बँकखात्यात वर्ग केली. मात्र, त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माया देवरे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×