चार अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी पोलिसांच्या ताब्यात
marathinews24.com
पुणे– जुन्या भांडणाच्या रागातून तरूणावर वार करणार्या टोळक्याला बिबवेवाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना १६ मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी कोंढवा रस्ता परिसरात राहणार्या तरूणाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी चार अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पुण्यात बिबवेवाडीतील कोयता गँगची काढली धिंड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हे १६ मे रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडीतील साईनाथनगरात नातेवाईकांसोबत गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी हातात शस्त्रास्त्र घेउन आलेल्या टोळक्याने तरूणावर अचानकपणे हल्ला केला. त्याच्या डोक्यात, पाठीवर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हल्ल्यानंतर अल्पवयीन टोळके पसार झाले होते. मात्र, बिबवेवाडी पोलिसांनी त्यांचा शोध घेउन चौघांना ताब्यात घेतले. पोलीस उपनिरीक्षक विवेक सिसाळ तपास करीत आहेत.