पोलीस ठाण्याच्या इमारतीतून उडी मारुन तरुणाची आत्महत्या

पोलीस ठाण्याच्या इमारतीतून उडी मारुन तरुणाची आत्महत्या

मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या आवारातील घटना

marathinews24.com

पुणे – पोलिसांनी समुदेशानासाठी बोलाविलेल्या तरुणाने मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या इमारतीतून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळी घडली. समीर हमीद शेख असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

नाशिकमध्ये चिमुकलीवरील अत्याचारानंतर हत्येच्या घटनेचे दुःख- डॉ. नीलम गोऱ्हे – सविस्तर बातमी 

मार्केटयार्ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेख हा नशेच्या आहारी गेला होता. त्यााने यापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. रविवारी (१६ नोव्हेंबर) शंकरशेठ रस्त्यावरील उड्डाण।पुलावरुन त्याने उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर सोमवारी (१७ नोव्हेंबर) शेखला कुटुंबीयांनी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केले होते. तो व्यसनमुक्ती केंद्रातील समुपदेशकांना काही न सांगता बेपत्ता झाला होता. घरी परतल्यानंतर त्याने पत्नीला आत्महत्येचा करण्याची धमकी दिली होती. पत्नीने याबाबतची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. त्याचे समुपदेशन केले. मुलासोबत शेखला घरी पाठवून देण्यात आले.

मंगळवारी (१८ नोव्हेंबर) शेखला मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात समुपदेशनासाठी बोलाविण्यात आले होते. पोलीस ठाण्यात आलेल्या शेखने नशा केली होती. सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास त्याने मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या छतावरुन उडी मारली. घटनेत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशीरा मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×