ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून दारूच्या नशेत मारली उडी अन दिला जीव…
Marathinews24.com
पुणे – ससून रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारत तरुणाने आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेसातच्या सुमारास घडली आहे. सुरेश मेढे (३१, मुळ रा. राजूर, ता. मोताळा, जि. बुलढाणा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश मेढे हा गुरूवारी (दि. ३) रात्री दारू पिऊन वेड्यासारखे वागत होता. त्यामुळे त्याला उपचारासाठी ससून रुग्णालयात भरती केले होते. त्यावेळी तरुणाने वॉर्ड क्रं. ४० च्या बाजूला असलेल्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.