Breking News
वै. हरिभक्त परायण सखाराम महाराज तडस निर्व्यसनी ग्रुप तर्फे आषाढी एकादशीनिमित्त घाटी रुग्णालय व अनाथ आश्रमात फराळ वाटपसस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हजतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात १०२ पिशव्यांचे संकलनदिवसा रेकी करून रात्री घरफोडी करणाऱ्या टोळीचा एलसीबीने केला पर्दाफाशमाहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरीच्या आमिषाने फसवणूकपुण्यात अल्पवयीनावर गाेळीबार करणारा गुंड अटकेतपुण्यात प्रेम प्रकरणातून अल्पवयीनाचा खूनशहरात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूगुंतवणुकदारांची ८८ कोंटींची फसवणूक; पसार झालेल्या आरोपीचे प्रत्यार्पणआरोग्यवारी अल्ट्राग्रुप रन-२०२६ निमित्त २६ जुलै रोजी पुणे–जेजुरी–बारामती मार्गावरील वाहतुकीत बदलपुण्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी गोळीबार

शेअर ट्रेडींगच्या आमिषाने तरूणाला ३५ लाखांचा गंडा

Pune Cyber Fraud

मांजरी बुद्रूक परिसरात घटना 

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ३४ लाख ५२ हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २६ जून ते १० सप्टेंबर कालावधीत मांजरी बुद्रूक परिसरात घडली आहे. याप्रकरणी तरूणाने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरातून सव्वा दोन लाखांचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण मांजरी बुद्रूक परिसरात राहायला असून, २६ जूनला सायबर चोरट्याने त्याला संपर्क केला. शेअर ट्रेडींगमध्ये गुंतवणूक करण्याच्या बहाण्याने तक्रारदाराचा विश्वास संपादित केला. चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. तब्बल ३४ लाख ५२ हजार रूपये जमा करूनही त्यांना परतावा देण्यात आला नाही. त्यामुळे तरूणाने संबंधिताला विचारणा केली असता, त्याने संपर्क बंद केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करीत आहेत.

बीट कॉईनमध्ये गुंतवणूकीच्या बहाण्याने १३ लाखांचा गंडा

टेलीग्रामद्वारे संपर्क साधून सायबर चोरट्यांनी एकाला बीटकॉईनमध्ये गुंतवणूकीच्या बहाण्याने तब्बल १२ लाख ९० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २८ मार्च ते १५ जून कालावधीत कोंढवा कात्रजमध्ये घडली आहे. याप्रकरणी संबंधिताने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइलधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक नवनाथ जगताप तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×