Breking News
सुनावणी प्रक्रियेत दस्तऐवजीकरणाला प्राधान्य द्या : शीतल तेलीप्रामाणिकपणा आणि लोकाभिमुख कार्याच्या आधारे जनतेचा विश्वास संपादन करा-राज्यपाल जिष्णु देव वर्माआदिवासी आश्रमशाळांमध्ये सर्पदंश जनजागृती व प्रतिबंध अभियान राबविण्याचा निर्णयराज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांना ‘संसदरत्न’ पुरस्कारगणेशमूर्ती कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी साकारल्या ३०० पर्यावरण मूर्तीमेट्रोची कामे कालमर्यादेत पूर्ण करा; जिल्हा परिषद शाळांची प्रत्यक्ष पाहणी करा : डॉ. नीलम गोऱ्हेतब्बल १०० हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे; सराईत चोर जेरबंदशेअरमध्ये गुंतवणूकीच्या नावाखालीसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जागतिक दर्जाचे शिक्षण केंद्र बनावे – राज्यपाल जिष्णु देव वर्माटेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

घरातून सव्वा दोन लाखांचे दागिने चोरीला

फ्लॅटबाहेर पादत्राणांच्या जाळीत चावी ठेवणे महागात

अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील २ लाख १२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना ३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर कालावधीत ताडीवाला रोड परिसरातील गल्ली नंबर १३ मध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोथरूडमध्ये वाढदिवस साजरा करणाऱ्या टोळक्याची दहशत – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे ताडीवाला रस्ता परिसरात राहायला असून, ३० सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला होता. कपाटाची चावी घेउन २ लाख १२ हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. काही दिवसानंतर तक्रारदाराला चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते तपास करीत आहेत.

नर्‍हेत घरातून मोबाइल, लॅपटॉप चोरीला

घराचा दरवाजा उघडा असल्याचे पाहून चोरट्यांनी मोबाइल, लॅपटॉप असा ७० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना ११ ऑक्टोबरला सकाळी साडेसातच्या सुमारास इंगळे वस्तीवरील कुणाल हाईटसमध्ये घडली आहे. याप्रकरणी तरूणाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अमलदार अहिरे तपास करीत आहेत.

शॉपीतून १ लाखांचे मोबाइल चोरीला

पुणे – मोबाइल शॉपीत दुरूस्तीसाठी आलेले १ लाख १० हजारांचे मोबाइल चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना ११ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर कालावधीत ज्ञानेश्वर पादुका चौकातील ओसलास हाउसमध्ये घडली आहे. याप्रकरणी एकाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे शिवाजीनगरमध्ये राहायला असून, ज्ञानेश्वर पादुका चौकात त्यांची मोबाइल शॉपी आहे. त्याठिकाणी मोबाइल दुरूस्तीची कामे केली जातात. ११ ऑगस्ट ते १० ऑक्टोबर कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या दुकानात दुरूस्ती आलेले १ लाख १० हजारांचे मोबाइल चोरून नेले. याप्रकरणी त्यांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपासाला गती देण्यात आली आहे. पोलीस अमलदार चव्हाण तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×