Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

अमली पदार्थांच्या विळख्यात तरुणाई ही गंभीर बाब-प्रा.डॉ. मिलिंद भोई

अमली पदार्थांना आळा घालण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज

marathinews24.com

पुणे – देश घडवण्याची जबाबदारी असणाऱ्या तरुण पिढीला अमली पदार्थांच्या राक्षसाने घातलेला विळखा ही अतिशय गंभीर गोष्ट असून पूर्वी तरुणाई मध्ये सुरू होत असलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनांनी आता शालेय वयात प्रवेश केला आहे अतिशय काळजी करण्याची गोष्ट आहे. याला आळा घालण्यासाठी शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था , राजकीय पक्ष, पोलीस, प्रशासन, प्रसारमाध्यमे या सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क मोहिमेचे समन्वयक, समुपदेशक प्रा.डॉ. मिलिंद भोई यांनी व्यक्त केले.

उंड्रीत बहुमजली इमारतीत आग; शाळकरी मुलाचा मृत्यू – सविस्तर बातमी

महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स, भोई प्रतिष्ठान पुणे आणि. युनिक इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यामाने से नो टू ड्रग्स या विषयावर आयोजित व्याख्यान सत्रात प्रा. डॉ. मिलिंद भोई बोलत होते.

ते म्हणाले, लहान वयातच अमली पदार्थांची सुरुवात शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक असून याचे वाढत चालले प्रमाण या कडे आपण सर्वांनी एक राष्ट्रीय समस्या म्हणून पाहणे गरजेचे आहे. याप्रसंगी महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क मोहिमेचे पोलीस उपमहानिरीक्षक प्रवीण पाटील, युनिक शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. ए आर. मुलाणी, प्राचार्य जयश्री जाधव, उपप्राचार्य सुनीता चांदगुडे, पर्यवेक्षक नफीसा कोतवाल, अमली पदार्थ विरोधी मोहिमेचे समुपदेशक शुभम मेदनकर, गणेश शिंदे संगीता रुद्राप, लखन वाघमारे, दिशा दोरुगडे उपस्थित होते. व्याख्यानसत्रात अमली पदार्थ चे दुष्परिणाम विषयी चित्रफीत याप्रसंगी सादर करण्यात आली.

यानिमित्ताने या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. मिलिंद भोई यांच्याशी विविध प्रश्न विचारून स्नेहसंवाद साधला. महाराष्ट्र पोलीस अमली पदार्थ विरोधी टास्क मोहिमेचे पोलीस उप महानिरीक्षक श्री प्रवीण पाटील यांनी या प्रकल्पाची माहिती देताना केंद्र सरकारच्या सूचनेनुसार हा विभाग या ज्वलंतविषयावर प्रभावीपणे कार्यरत असून राज्याच्या कानाकोपऱ्यातील गावांमध्ये, शैक्षणिक संस्थांमध्ये अशा प्रकारचे जनजागृतीचे उपक्रम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याची माहिती याप्रसंगी दिली.युनिक इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक प्रा. डॉ.आर.ए.मुलाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केल्या गेलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी अमली पदार्थ विरोधी मोहिमेत सहभागी होऊन या विरोधात कार्यरत राहण्याची शपथ याप्रसंगी घेतली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×