Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

उंड्रीत बहुमजली इमारतीत आग; शाळकरी मुलाचा मृत्यू

स्फोटात दोन जवानांसह पाच जण जखमी

marathinews24.com

पुणे – शहरातील कोंढवा भागातील उंड्रीतील इमारतीतील बाराव्या मजल्यावर असलेल्या सदनिकेत शुक्रवारी आग लागली.घरात सिलिंडरचा स्फोट झाल्याने १५ वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाला. आग आटोक्यात आणणाऱ्या दोन जवानांसह पाच जण जखमी झाले. तर्ष कमल खेतान (वय १५) असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. डाॅ. मृणाल मयंक (वय ४२), योगेश गिरीधर जाधव (वय ४५) ,जिशान साहिल खान (वय ३५), विनोद मोहन लिमकर (वय ३२), तसेच अग्निशमन दलाचे जवान विश्वजीत मधुकर वाघ (रा. कोंढवा बुद्रुक) व पृथ्वीराज परमेश्वर खेडकर (रा. कोंढवा खुर्द) हे जखमी झाले आहेत.

डाॅ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचा अपघात, मोटारीचे टायर फुटले – सविस्तर बातमी

कोंढवा-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर असलेल्या उंड्री भागात मार्वल आयडियल सोसायटी ही चौदा मजली इमारत आहेहे. या इमारतीच्या बाराव्या मजल्यावर खेतान कुटुंबीय राहायला आहे. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास तर्ष सदनिकेत एकटाच होता. त्यावेळी अचानक सदनिकेत आग लागली. तर्षने आरडाओरडा सुरू केला. तेव्हा सोसायटीमधील रहिवासी डाॅ. मयंक, जाधव, व्यवस्थापक आणि सुरक्षारक्षक हे त्याला वाचविण्यासाठी तेथे गेले. आग पसरल्यानंतर स्वयंपाक घरातील सिलिंडरचा स्फोट झाला. स्फोटानंतर आग भडकली. त्यात वाचविण्यासाठी गेलेले सोसायटीतील रहिवासी आणि सुरक्षारक्षक जखमी झाले. घटनेची माहिती मिळताचअग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. आग आटोक्यात आणताना अग्निशमन दलाचे जवान जखमी झाले. जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आगीत खेतान यांच्या सदनिकेतील साहित्य जळाले.

अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग आटोक्यात

आग भडकल्यानंतर घटनास्थळी पाच बंब दाखल झाले. बहुजमली इमारत असल्याने अग्निशमन दलाने अत्याधुनिक शिडी तेथे मागविली. बाराव्या मजल्यावरील आग पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे जवानांनी काळजी घेत पाण्याचा मारा करुन अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली. मात्र, आगीत एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर सोसायटीतील रहिवाशांनी हळहळ व्यक्त केली.

उंड्रीतील मार्वल आयडियल सोसायटीतील बाराव्या मजल्यावर आग होती. आग लागल्यानंतर संभाव्या धोका विचारात घेऊन वीजपुरवठा खंडीत करण्यात आला. बाराव्या मजल्यापर्यंत जवान पायऱ्यांनी गेले. या इमारतीतील अग्निशमन यंत्रणा (फायर फायटिंग सिस्टिम) बंद असल्याचे उघडकीस आले. सोसायटीतील अग्निशमन यंत्रणा बंद असल्याने मदतकार्यात अडथळे आले. या प्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती अग्निशमन दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी दिले. सोसायटीतील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, ही सोसायटीची जबाबदारी आहे. याबाबतच्या नियमावलींचे पालन करणे गरजेचे आहे, असे आवाहन पोटफोडे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×