Breking News
भारतीय संस्कृती, कलेचा प्रसार जगभर व्हावा- दिग्पाल लांजेकरदिड दिवसाचे गणपती बाप्पांचे विसर्जन; वानवडीत घरामध्ये आगीची घटनागणेश मंडळाच्या माध्यमातून शासकीय योजनांच्या जनजागृतीसाठी लोकसंवाद अभियानराष्ट्रीय लोकअदालतीत पुणे जिल्ह्यात ३७,६८७ प्रकरणांचा सामोपचाराने निपटारापिंपरी-चिंचवडमध्ये १६ ते २९ सप्टेंबरदरम्यान मनाई आदेशभीमाशंकर मंदिर व परिसराच्या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडीपशुधन विमा योजनेसाठी अर्ज मागविण्यास सुरुवात तंत्रज्ञानाला श्रद्धेची जोड; नोबल कास्टमध्ये ॲल्युमिनियमपासून साकारला गणरायाअतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना धक्काबुक्कीपेन्शन कार्डच्या आमिषाने ज्येष्ठाची २४ लाखांची फसवणूक

बेकायदा बाळगलेल्या पिस्तुलातून गोळीबारात तरुण जखमी

पिस्तूल बाळगणार्‍या तिघांना बेड्या, ३ पिस्तूल ९ काडतुसे जप्त

धनकवडीतील आंबेगाव पठार भागातील घटना

marathinews24.com

पुणे – बेकायदा बाळगलेल्या देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार झाल्यानंतर एक तरुण जखमी झाल्याची घटना धनकवडीतील आंबेगाव पठार भागात घडली. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली असून, साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. संकेत गोरक्ष चोरघे (रा. कोलवडी, ता. वेल्हे, जि. पुणे) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी अविनाश मोरे (रा. धनकवडी) याला अटक करण्यात आली असून, साथीदार सनी उर्फ संदीप सुभाष दीपक (वय ३०, रा. फाईव्ह स्टार सोसायटी, धनकवडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

कर्वेनगर परिसरात जेष्ठ महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरघे हा सराईत आहे. त्याने देशी बनावटीचे बेकायदा पिस्तूल बाळगले होते. हे पिस्तूल त्याने चोरघेकडून घेतले होते. मंगळवारी (१ सप्टेंबर) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास धनकवडीतील आंबेगाव पठार येथील साईसिद्धी चौकात चोरघे, मोरे, दीपक हे थांबले होते. दीपक याचा भाजीपाला विक्रीचा व्यवसाय आहे. चोरघे याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती दीपक याला होती. त्याने याबाबतची माहिती पोलिसांना दिली नव्हती. आरोपी दीपक हा पिस्तूल हाताळत होता. पिस्तूल हाताळताना अचानक चाप ओढला गेला. पिस्तुलातून सुटलेली गोळी चोरघे जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते, सहायक आयुक्त राहुल आवारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून, गोळीबारात जखमी झालेला चोरघे याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×