Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

कल्याणीनगरमधील स्पा सेंटरवर छापा

कल्याणीनगरमधील स्पा सेंटरवर छापा

वेश्याव्यवसाय उघड, एकाला अटक

marathinews24.com

पुणे – शहरातील कल्याणीनगर परिसरात मसाज सेंटरच्या आडून सुरू असलेला वेश्या व्यवसाय पोलिसांनी उघड केला. कारवाईत एका आरोपीला अटक केली आहे. येरवडा पोलिसांनी छापा टाकून हा प्रकार उघडकीस आणला. ही कारवाई ईश्वरधाम अपार्टमेंट, जॉगर्स पार्कजवळील “निरा स्पा” मसाज सेंटरमध्ये ३१ मार्चला रात्री करण्यात आली. याप्रकरणी अरमान रहिमउद्दीन हुसेन (वय २१) याला अटक करण्यात आली असून, त्याच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे.

सावधान गुंडानो; सुधारणा न झाल्यास निघणार तुमची धिंड – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमताने मसाज सेंटरच्या नावाखाली संबंधित ठिकाणी कुंटणखाना चालवला होता. पीडित मुलींना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. तसेच, त्यांच्या कमाईवर उपजीविका करत त्यांचे लैंगिक शोषण करण्यात येत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यासह संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक दर्शन देवगडे पुढील तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×