Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

सावधान गुंडानो; सुधारणा न झाल्यास निघणार तुमची धिंड

सावधान गुंडानो; सुधारणा न झाल्यास निघणार तुमची धिंड

पोलीस आयुक्तांकडून रामटेकडी पोलीस चौकीचे भूमिपूज

marathinews24.com

पुणे – शहरातील ‘हडपसरमधील रामटेकडी परिसरात दाट वस्ती आहे. या भागात गुन्हेगारी आहे. गुन्हेगारांना पोलिसांकडून सुधारण्याची संधी देण्यात येते. सुधारणा न झाल्यास गुंडाविरुद्ध कडक कारवाई करून त्यांची धिंड काढण्यात येईल,’ असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. हडपसरमधील रामटेकडी परिसरात नवीन पोलीस चौकी बांधण्यास बांधकाम व्यावसायिक नाईकनवरे यांच्याकडून सहाय्य करण्यात आले आहे. पोलीस चौकीचे भूमिपूजन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या हस्ते करण्यात आले.

कामगार योजनेतील लाभार्थ्यांची संख्या दोन कोटींपर्यंत वाढवावी – सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर – सविस्तर बातमी 

कार्यक्रमाला आमदार चेतन तुपे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गु्न्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज देशमुख, परिमंडळ पाचच्या पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी आधिकारी सतीशकुमार खडके, नगरसेविका हेमलता मगर, बांधकाम व्यावसायिक हेमंत नाईकनवरे, रणजीत नाईकनवरे, गौरी नाईकनवरे उपस्थित होते.

‘गृह विभागाने गेल्या वर्षी पुण्यात १२ नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली. नवीन पोलीस ठाण्यांचे कामकाज सुरू झाले. पुणे पोलीस दलात लवकरच १८०० पोलीस शिपायांची भरती होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर १८०० पोलीस शिपाई सेवेत रूजू होणार आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्याचे कामकाज चालविताना मनुष्यबळाची उणीव भासणार नाही. रामटेकडी वसाहतीत ३० हजार नागरिक राहायला आहेत. या भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, तसेच अवैध धंदे करणाऱ्यांची माहिती संकलित करण्यात येणार अहे. सराइतांना पोलिसांकडून सुधारण्याची संधी देण्यात येते. त्यांच्यात सुधारणा न झाल्यास कडक कारवाई करण्यात येईल, तसेच त्यांची धिंडही काढण्यात येईल,’ असे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी स्पष्ट केले.

‘पोलिसांकडून नगरसेवकांशी संवाद साधण्यात येत आहे. प्रभागातील गुन्हेगारी, अमली पदार्थ विक्री, अवैध धंद्यांविरुद्ध कारवाईसाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्यासाठी नगरसेवकांचे सहकार्य महत्त्वाचे असणार आहे,’ असे त्यांनी नमूद केले. चेतन तुपे, हेमंत नाईकनवरे यांनी मनोगत व्यक्त केले. रणजीत नाईकनवरे यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×