पीएसआय म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत १० लाखांना फसवले
Marathinews24.com
पुणे – महाराष्ट्र पोलीस खात्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून नोकरीला लावण्याचे आमिष दाखवत एकाने १० लाखांना फसवले. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणाने दिलेल्या
फिर्यादीवरून बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महादेव बाबूराव दराडे (वय ३५) असे आरोपीचे नाव आहे.
शेतकऱ्याकडून घेतली १ लाखाची लाच – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दराडेने २२ वर्षीय तरुणाला पीएसआय पदावर नोकरीला लावतो असे आमिष दाखवले. त्यासाठी १ मे २०२२ ते ४ मार्च २०२४ या कालावधीत आरोपीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तरुणाकडून वेळोवेळी १० लाख रुपये घेतले. पैसे घेऊनही पीएसआयची नोकरी लागत नसल्याने आणि दिलेले पैसे दराडे परत करत नसल्याने तक्रारदाराने पोलिस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. याप्रकरणाचा पुढील तपास गुन्हे शाखा युनिट दोन लचे सहायक पोलिस निरीक्षक अमोल रसाळ करत आहेत.