Breking News
आवडते काय आणि येते काय, यातील फरक ओळखा-ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामलेआमदार संजय गायकवाडांविरोधात गुन्ह्याच्या मागणीसाठी रोहित पवारांचा कोथरूड ठाण्यात ठिय्याधर्मादाय आयुक्तांची परवानगी न घेता संस्थेची ५० कोटींची जमीन तारणदिशाहीन नियोजन व एफएसआय’च्या अनिर्बंध अतार्किक मंजुऱ्यां मुळे ‘पुणे वाहतुक कोंडीच्या’ संकटात…!भरती परीक्षा सुधारणांसाठी शनिवारी पुण्यात सल्लामसलतजिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली चाकण एमआयडीसी परिसरातील पायाभूत सुविधा समितीची बैठक संपन्नएमडी विक्रीच्या तयारीतील त्रिकुटाला बेड्यागणेश विसर्जन मिरवणुकांमधून तंबाखू व अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान राबवावे- ज्योती कदमपुण्यातील सराईतांना दणका, २२ जण तडीपारपुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन सराईत तडीपार

१५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, वार करणार्‍या टोळीला अटक

१५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, वार करणार्‍या टोळीला अटक

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – शहरातील पुणे रेल्वे स्थानकातील वरिष्ठ बुकिंग क्लार्कवर (सीसीटीसी) चाकूने वार करुन लुटमार करणार्‍या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी डोंबिवलीतून अटक केली आहे. तब्बल १५०सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना १८ ऑगस्टला रात्री एकच्या सुमारास तिकीट विक्री केंद्राजवळ घडली होती. जितेंद्र मोतीराम राठोड (वय २४ रा. चाळीसगाव, डोंबिवली) ईश्वर गोरख चव्हाण (वय २३ रा. दसनाबाद, संभाजीनगर, सध्या- डोंबिवली) अजय मदन चव्हाण (वय २५ रा. डोंबिवली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुण्यात दाम्पत्याचा घटस्फोटाचा वाद थेट गोळीबारापर्यंत – सविस्तर बातमी 

तक्रारदार हे पुणे स्टेशनवर वरिष्ठ बुकिंग क्लार्क असून, १८ जुलैला रात्रपाळीला काम करीत होते. त्यावेळी एकच्या सुमारास आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर चाकूने वार करून दोन मोबाइल, सोन्याची चैन हिसकावून नेली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास पथकाने १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा माग काढला. आरोपी हे भोपरगाव कमानी, डोंबिवलीतील असल्याची माहिती पोलीस अमलदार प्रकाश आव्हाड, सारस साळवी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाउन २१ ऑगस्टला तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, एसीपी वसंत कुंवर, वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे, पोलीस निरीक्षक विनोद सलगरकर, प्रदीप शितोळे, महेश जाधव, युवराज गायकवाड यांनी केली.

१५० सीसीटीव्ही कॅमेर्‍यांनी दाखवली वाट

लुटमारीतील आरोपींचा शोध घेण्यासाठी बंडगार्डन तपास पथकाने आजूबाजूच्या १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्याद्वारे फोटो मिळवून आरोपींचा माग काढला. त्यानंतर खबर्‍यांच्या माहितीनुसार पथकाने त्रिकुटाला अटक केली. त्यांच्याकडून दोन मोबाइल, सोन्याची चैन जप्त केली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×