Breking News
Pune Police Action Against Criminals : पुणे पोलिसांची सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाईAkshaya Patra Foundation Pune : पुण्यात दररोज १० हजार विद्यार्थ्यांना अक्षय पात्रकडून मध्यान्ह भोजनPune Metro Line 3 : पुणे मेट्रो लाइन ३ ला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसादBangkok to Pune Drug Smuggling : सुकामेवा, नुडल्‍सच्‍या पॅकेटमधून हायड्रोपोनिक गांजाची तस्‍करीSafai Karmachari Issues Pune : सफाई कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न कालमर्यादेत सोडवा – भगवत प्रसाद मकवानाBaramati Youth Festival 2026 : बारामती येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव उत्साहात संपन्नPune Cyber Crime : एसआयआरचा फॉर्म भरण्याची बतावणीने गंडाPune Crime News : येरवड्यात घरफोडी, दीड लाखांचा ऐवज चोरीलाPune Police Constable Suspended : पुणे पोलीस आयुक्तांच्या बंगल्यात ड्रामा करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबनIllegal Pesticide Stock Seized Pune : पुण्यात ६५.३४ लाख रुपयांचा बेकायदेशीर कीटकनाशक साठा जप्त

शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने १९ लाखांचा गंडा

Pune Investment Fraud

नांदेड सिटी पोलिस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवत सायबर चोरांनी एकाची १९ लाख ९ हजारांची फसवणूक केली. याप्रकरणी नांदेड सिटी पोलिस ठाण्यात सायबर चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रेनच्या टपावरून पडल्याने कामगाराचा मृत्यू – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डी.एस.के. विश्व, धायरी येथील तक्रारदाराला १५ मे ते १ ऑगस्ट २०२५ या कालावधीत सायबर चोरांनी संपर्क साधून शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत तक्रारदाराने १९ लाख ९ हजारांची गुंतवणूक केली. त्यानंतर त्यांना कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर तक्रारदाराने पोलिस ठाण्यात जात तक्रार दिली. याप्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक अतुल बोस हे करत आहेत.

ट्रेडिंगच्या नावाखाली १ कोटी ३८ लाखांची फसवणूक

पुणे – ॲप डाऊनलोड करण्यास सांगत ट्रेडिंग करण्याच्या माध्यमातून किरकोळ परतावा देत एकाची सायबर चोरांनी १ कोटी ३८ लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी कर्वे नगर येथील ४५ वर्षीय तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराला ११ एप्रिल ते १२ जून दरम्यान सायबर चोरांनी संपर्क करत एक ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यावर एक अकाउंट करण्यास सांगत ट्रेडिंगच्या माध्यमातून चांगला नफा मिळेल असे आमिष दाखवत गुंतवणूक करण्यास भाग पाडली. सुरुवातीला किरकोळ परतावा देत सायबर चोरांनी तक्रारदाराचा विश्वास संपादन केला. त्यानंतर तक्रारदाराने १ कोटी ३८ लाखांची गुंतवणूक केल्यानंतर त्याबदल्यात केवळ ७० हजार रुपयांचा परतावा दिला. त्यानंतर कोणताही परतावा अथवा मूळ रक्कम परत न मिळाल्याने तक्रारदाराला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याप्रकरणाचा पुढील तपास सायबर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×