चार तरुणांविरुद्ध गुन्हा, एकाला अटक
marathinews24.com
पुणे – नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याच्या हेतूने टोळक्याने पाषाण परिसरात तलवारींसह दगडांनी दुचाकींची तोडफोड केली आहे. दरम्यान, टोळक्याने तलवारी नाचवत दहशत निर्माण केल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ही घटना ही घटना सोमवारी २१ एप्रिलला रात्री साडेबाराच्या सुमारास घडली. याप्रकरणी साहिल नागेश कसबे (वय १८) याला अटक केली आहे. तक्रारदार चेतन शेषराव धन (वय २६) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
बाणेर आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे इंचार्ज बदलले – सविस्तर बातमी
पाषाण परिसरात सोमवारी रात्री घडलेल्या भयानक घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे. टोळक्याने संजयनगरमध्ये रस्त्यांवर तलवारी नाचवून दुचाकींचे हेडलाइट्स आणि इंडिकेटर तोडले. चौघांच्या हिंसक कृत्यांमुळे संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय बनला आहे. तोडफोडीत ५ मोटारसायकलींचे नुकसान झाले. पोलिसांनी घटनास्थळावरून एका आरोपीला अटक केली आहे, तर इतर तिघांचा शोध सुरू आहे. या घटनेबाबत चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय फौजदारी संहितेच्या गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये शस्त्रास्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलिस कायद्याचा समावेश आहे.
तक्रारदार चेतन शेषराव धन हे कलाकार आहेत. ते पाषाण येथील संजयनगरमध्ये भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी सोमवारी नेहमीप्रमाणे दुचाकी रस्त्यालगत पार्क केली होती. रात्री अचानक आवाज ऐकून चेतनला जाग आली. शेजार्यांनी दार ठोठावून त्याला काहीजण दुचाकीवर हल्ला करत असल्याची माहिती दिली. चेतन घराबाहेर आला असता, चौघेजण दगड आणि तलवारींनी त्याच्या आणि शेजार्यांच्या मोटारसायकली फोडताना दिसले. स्थानिकांच्या धाडसामुळे एका आरोपीला अटक करण्यात आली. अटक केलेल्या हल्लेखोराचे नाव साहिल नागेश कसबे (वय १८) असे आहे.
चौकशीदरम्यान साहिलने आदित्य जगन्नाथ मानवतकर, ओंकार रतन मानवतकर आणि मंगेश सोमनाथ जाधव या साथीदारांची नावे उघड केली. आरोपीचे पूर्वी परिसरातील काही मुलांशी भांडण झाले होते. त्याच रागातून चौघांनी मिळून हा हल्ला केला. ओंकार मानवतकर आणि मंगेश जाधव यांनी रस्त्यावर राहणार्या काही मुलांसोबत झालेल्या जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी योजना आखली होती. त्यामुळेच वाहनांवर हल्ला करण्यात आला. दुचाकीचा हेडलाइट, मडगार्ड आणि वरचा भागाची तोडफोड केली आहे. चतःशृंगी पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. स्थानिकांकडून माहिती गोळा केल्यानंतर त्यांनी आरोपीला अटक केली. घटनास्थळारील पुराव्याच्या आणि प्रत्यक्षदर्शींच्या मदतीने पोलिसांनी तीन आरोपींची ओळख पटवली आहे. प्रकरणाचा तपास तपास अधिकारी उपनिरीक्षक अंगत नेमाने करीत आहेत.
पोलीस गस्तीची नागरिकांची मागणी
संजय नगरमधील रहिवासी आता वाहनांच्या सुरक्षिततेबद्दल चिंतेत आहेत. पोलिसांनी रात्रीच्या वेळी गस्त वाढवावी आणि अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील ज्येष्ठ नागरिक आणि दुकानदारांनी केली आहे. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की आम्ही शांततेत राहतो, परंतु अशा घटनांमुळे भीती निर्माण होते. आम्हाला आशा आहे की पोलिस लवकरच उर्वरित आरोपींना अटक करून कारवाईची मागणी नागरिकांनी केली आहे.