फसवणूक करणार्यांविरुद्ध गुन्हा
marathinews24.com
पुणे – अनाथांची माय दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या नावाचा गैरवापर करुन आरोपींनी तरुणांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या पुण्यातील आश्रमात लग्नासाठी मुली असल्याची बतावणी करीत तरूणांची फसवणूक केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. लग्नासाठी इच्छुक असलेल्यांना फोन करून रजिस्ट्रेशनसाठी १५ हजारांवर ऑनलाईन रक्कम घेण्यात आली आहे. याप्रकरणी सासवड पोलिसांनी आरोपींविरूद्ध ३१९ (४), ३१८ (४), ३५६ (२), आयटी अॅक्ट ६६ या कलम अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
उपविभागीय कार्यालय बारामती व इंदापूर तहसिल कार्यालयात 9 जूनला लोकअदालतीचे आयोजन – सविस्तर बातमी
दिवंगत सिंधुताई सपकाळ यांच्या आश्रमात लग्नासाठी मुली आहेत अशी बतावणी करीत संबंधितांनी अनेकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, आरोपींनी तरूणांकडून रजिस्ट्रेशनसाठी प्रत्येकी १५ हजार रूपये घेतल्याचे दिसून आले आहे. फोन पेसह गुगल पेद्वारे रक्कम स्वीकारली असून, यासंदर्भात दोन दिवसांपूर्वी ममता सपकाळ यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार आता संबंधित आरोपींचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. मात्र, मुलांच्या लग्नासाठी पालक, नातेवाईक मुलगी मिळावी म्हणून मोजेल ती किंमत मोजायला तयार असल्याचेही दिसून आले आहे.