Breking News
आयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रमMedicine Fraud : ओैषध वितरकाची ६३ लाखांची फसवणूकPune Cyber Crime : वाहतूक दंडाच्या लिंकद्वारे पावणेदोन लाखांची फसवणूकPune Ganeshotsav : उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटीMarket Yard Ganeshotsav : भाजीपाला, फळे अन् कंदमुळांतून साकारली गणरायाची अनोखी आरास

पुण्यात नवीन ५ पोलिस ठाणी, दोन परिमंडळांना शासनाचा हिरवा कंदील

पुणे पोलीस दलातील २५ अधिकारी-अंमलदारांना केंद्रीय गृहमंत्र्यांचे सेवा पदक

८३० मनुष्य बळाला मंजुरी; ३ उपायुक्‍त ६ सहायक पोलिस आयुक्‍त पदालाही मंजुरी

marathinews24.com

पुणे – शहरातील वाढत्या नागरिकीकरणाच्या अनुषंगाने अतिरिक्त पोलीस ठाण्यासह पोलीस मनुष्य बळ उपलब्ध करण्यासाठी राज्य शासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. त्यानुसार नव्याने आणखी ५ पोलिस ठाण्यांना, दोन नवीन परिमंडळांना अखेर मंजुरी मिळाली आहे. त्याबरोबर तीन उपायुक्‍त आणि सहा सहायक पोलिस आयुक्‍त पदेही १४ डिसेंबरला शासन निर्णयाद्वारे मंजुरी देण्यात आली आहे.

महाराष्ट्र बटालियन आर्टिलरी एनसीसी, नागपूरच्या कॅडेट्सना विधान भवन येथे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे विशेष मार्गदर्शन – सविस्तर बातमी – सविस्तर बातमी

लोहगाव, लक्ष्मीनगर, नर्हे, येवलेवाडी, मांजरी पोलिस ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे. तर परिमंडळ (झोन) ६ आणि परिमंडळ ७ ला मंजुरी मिळाली आहे. तसेच ८३० मनुष्यबळ मंजुर केले आहे.

विमानतळ पोलिस ठाण्यातून लोहगाव पोलिस ठाणे, येरवडा पोलिस ठाण्यातून लक्ष्मीनगर पोलिस ठाणे, सिंहगडरोड पोलिस ठाण्यातून नर्हे पोलिस ठाणे, कोंढवा आणि भारती विद्यापीठमधून येवलेवाडी पोलिस ठाणे, हडपसर पोलिस ठाण्यातून मांजरी पोलिस ठाणे यांना मंजुरी मिळाली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वित्त व गृहविभागाला नवीन पोलिस ठाण्यांचा, मनुष्य बळाचा, दोन नवीन झोनचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्या पुणे शहरातील गुन्हेगारीचा लेखा जोखा मांडताना पुण्यात आणखी पोलिस ठाण्यांची आवश्यकता का आहे हे नमूद केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आता ही पाच पोलिस ठाणे शहरात होणार आहेत. नव्याने दोन परिमंडळांची निर्मीती करण्यात आली आहे. सहा आणि सात परिमंडळासाठी 2 कोटी 36 लाख 48 हजार रूपयांची मंजुरी आली आहे.
पोलिस आयुक्‍त अमितेश कुमार यांच्‍या मार्गदर्शनात कमी कालावधीत पाच पोलिस ठाणी व दोन परिमंडळ निर्माण होण्याची ही पहिलीच वेळ आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनात ठाण्यांना मंजुरी मिळाली आहे. सहायक पोलिस आयुक्‍त विवेक पवार यांनी वारंवार पाठपुरावा केला.

परिमंडळ १

खडक, फरासखाना, समर्थ, विश्रामबाग, शिवाजीनगर, डेक्‍कन

परिमंडळ २

स्वारगेट, सहकारनगर, पर्वती, बिबवेवाडी, मार्केटयार्ड, भारती विद्यापीठ, आंबेगाव

परिमंडळ ३-

कोथरूड, वारजे माळवाडी, अलंकार, उत्‍तमनगर, नांदेडसिटी, सिंहगडरोड, नऱ्हे

परिमंडळ ४ –

बाणेर, चतुःश्रृंगी, खडकी, विश्रांतवाडी, येरवडा, लक्ष्मीनगर

परिमंडळ ५-

येवलेवाडी, कोंढवा, वानवडी, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, लष्कर

परिमंळड ६-

मुढवा, हडपसर, काळेपडळ, फुरसुंगी, मांजरी, लोणी काळभोर

परिमंडह ७

लोणीकंद, वाघोली, लोहगाव, विमानतळ खराडी, चंदननगर

पोलिस ठाण्यांसाठी 830 पदांची मंजुरी देताना त्‍यासाठी 67 कोटी 41 लाख 67 हजार 280 रूपयांचा निधीची तरतूद करण्यात आला आहे.

तीन पोलिस उपायुक्‍त व सहा सहायक पोलिस आयुक्‍त

शहरात आता तीन पोलिस उपायुक्‍त आणि सहा सहायक पोलिस आयुक्‍त पदांना मंजरु देण्यात आली आहे. त्‍यासाठी 1 कोटी 93 लाख 46 हजारांची निधीची तरतूद करण्यात आली आहे.

शहरात सात पोलिस ठाणी कार्यान्वीत करण्यात आली आहे. शहराचा वाढता विस्तार पाहता आणखी पाच पोलिस ठाण्यांची, झोनची तसेच मनुष्य बळाची गरज यापूर्वी प्रस्‍तावात नमूद करण्यात आली होती. त्यानुसार शासन निर्णयाद्वाने पाच पोलिस ठाणी, दोन परिमंडह आणि मनुष्य बळाला मंजुरी दिली आहे. लवकरच ही नवीन पोलिस ठाणी कार्यान्वित करण्यात येतील. – अमितेश कुमार, पोलिस आयुक्‍त पुणे

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×