Breking News
Pune Chain Snatching : पुणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी सोनसाखळी हिसकावणार्‍या दोघांना बेड्या, ६ गुन्हे उघडकीसMaharashtra Voter List Revision : मतदार यादीवरील दावे व हरकती दाखल करण्यास २६ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढSeva Sankalp Abhiyan 2026 : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतर्फे ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत विविध उपक्रमRabi Season Seed Subsidy : रब्बी हंगाम २०२६ साठी प्रमाणित बियाणे वितरणाकरिता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहनPimpri Chinchwad RTO Action : प्रवासी वाहतुकीतून मालवाहतूक करणाऱ्या १८ वाहनांवर कारवाई; २ लाख १५ हजारांचा दंडPune Zilla Parishad : सक्षम माता, सशक्त किशोरी; रक्तक्षयमुक्त पुण्यासाठी जिल्हा परिषदेचा पुढाकारVB-G RAMJI Mission : १५ ऑक्टोबरपर्यंत ग्रामसभा; ३१ ऑक्टोबरपर्यंत कामांना प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देण्याचे नियोजनPune Bus Chain Theft : पुण्यात बसमध्ये जेष्ठाची चैन चोरणार्‍या माय-लेकाला बेड्याHadapsar Bar Assault : पुण्यात बारमध्ये आधी बील देण्याचा वाद, तरुणाला बेदम मारहाणBaner Murder Case : दोघांत मध्यस्थी करणार्‍या तरुणाचा भोसकून खून

कुख्यात घायवळ टोळीविरूद्ध ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्र

आर्मअ‍ॅक्ट, मोक्का गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास

marathinews24.com

पुणे – कुख्यात गुंड निलेश घायवळसह टोळीतील ९ आरोपीविरूद्ध पुणे पोलिसांनी १२ जानेवारीला तब्बल ६ हजार ४५५ पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. आर्मअ‍ॅक्ट, मोक्का गुन्ह्यात टोळीविरूद्ध कोथरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यासंदर्भात गुन्ह्याचा तपास करीत पोलिसांनी टोळीविरूद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे.

जेष्ठाची सायबर चोरट्यांकडून तब्बल २२ कोटींची फसवणूक – सविस्तर बातमी

तक्रारदार हे १७ सप्टेंबरला रात्री पावणेबाराच्या सुमारास कोथरूडमधील मुठेश्वर मित्र मंडळ चौकाजवळ गप्पा मारत थांबले होते. त्यावेळी दुचाकीवर आलेल्या मयुर कुंबरे, रोहित आखाडे, गणेश राउत, माँटी व्यास सर्व रा. कोथरूड यांंनी तक्रारदाराला दमदाटी केली. तुम्हाला लय माज आला आहे का? कशाला थांबला आहे येथे, हा आमचा एरिया आहे. रोहित ठोक रे यांना असे म्हणत शिवीगाळ केली. मयुर कुंबरे याने तक्रारदाराला मारण्याच्या उद्देशाने पिस्तूलातून गोळी झाडून गंभीर जखमी केले होते. गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपी निलेश घायवळ, मयुर कुंबरेसह साथीदारांनी गणेश विसर्जनादिवशी ६ सप्टेंबरला कट रचला होता.

कोथरुड भागात आपली दहशत कमी झाली आहे. टोळीचे वर्चस्व वाढविण्यासाठी हमराज चौक, शास्त्रीनगर भागात काही दिवसांत जोरात धमाका करा, वेपन, पैसे मी पुरवितो. केस लागली तर बाहेर काढतो. अशी चिथावणी गुंड नीलेश घायवळ याने टोळीला दिली होती. त्यासाठी त्याने संबंधितांना पिस्तूलही दिले होते. त्यापार्श्वभूमीवर टोळीविरूद्ध २५ सप्टेंबरला मोक्कानुसार कारवाई करण्यात आली. आरोपींनी वापरलेले पिस्टल, पुंगळी, आरोपी निलेश घायवळ याच्या घरझडतीमध्ये २ जिवंत राऊंड, ४ मोकळया पुंगळया जप्त केल्या होत्या. याप्रकरणात ९ आरोपींना अटक केली असून, ८ पाहिजे आरोपींना न्यायालयाकडून वॉरंट काढून फरार घोषित केले.

फरार आरोपी निलेश घायवळ याला अटक करण्यासाठी इंटरपोल पोलिसांच्यावतीने नोटीस पाठवण्यात आली आहे. दरम्यान, आरोपी निलेश घायवळ व सचिन घायवळ यांनी कोथरूडमध्ये दोन बेकायदेशीर इमारती बांधल्या आहेत. त्यावर कारवाई करण्यासाठी महापालिकेशी पत्रव्यवहार केला आहे. गुन्हयात १२२ साक्षीदार तपासले असून, ६ साक्षीदारांचे जबाब नोंदवले आहेत. ही कामगिरी सहायक पोलीस आयुक्त विजय कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, एपीआय राजेश माळेगावे, एपीआय अमोल रसाळ, उपनिरीक्षक विशाल चव्हाण, सुनिल राऊत, संतोष डोळस, नितीन काळे, उत्तेकर यांनी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×