फरासखाना पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – पुण्यात ८ बांग्लादेशी महिलांना अटक – भारतात विनापरवाना येउन पुण्यातील बुधवार पेठ वेश्याव्यवसाय करणार्या बांग्लादेशी महिलांचा फरासखाना पोलिसांनी पर्दापाश केला आहे. याप्रकरणी ८ महिलांना अटक केले आहे. अंजुरा बेगम कामरुल चौधरी (वय ४०), खदीजा बेगम महाबुर शेख (वय २७) पारोल बेगम मिठु शेख (वय ३८) तंजीला बेगम आलमगीर काझी (वय ४०) रुपाली बेगम अकबर शेख (वय ३८) मन्सुरा रफिक हवालदार अख्तर (वय १९) सिमा आलमगीर शेख (वय ४५) खातून फोजर गाजी वय ३२ रिना गाजी (वय ३२ सर्व रा. बुधवार पेठ पुणे, मूळ बांगलादेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशानुसार पोलिसांनी सर्चमोहिम राबविली.
विनापरवाना राहणार्या बांग्लादेशी नागरिकांची सर्चमोहिम राबवून कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले होते. त्यानुसार फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवार पेठेत शोधमोहिम राबविली. पथकाने ढमढेरे गल्लीतील आशा इमारतीत छापा टाकून ८ बांग्लादेशी महिलांना ताब्यात घेत अटक केली. ही कामगिरी पोलीस निरीक्षक अजित जाधव, उत्तम नामवाडे, एपीआय वैभव गायकवाड, शितल जाधव, उपनिरीक्षक अरविंद शिंदे, उपनिरीक्षक पुनम पाटील, मेहबुब मोकाशी, खराडे, निढाळकर, शिंदे, तेलंगे, नांगरे, पासलकर, शिंदे, साबळे, शिंदे, पाटील, करदास, मनीषा पुकाळे, कांबळे, गजानन सोनुने, पवार, नितीन जाधव, खुट्टे, जाधव, फिराज शेख, पालांडे, जुंबड, मपोशि, भालेराव, राऊत, चोरघडे, ढवळे, बनसोडे, जाधव, महाडिक, ओव्हाळ, यांनी केली.
छुप्या पध्दतीने बॉर्डर पार करुन हिंदुस्थानात
बांग्लादेशी महिला छुप्या पद्धतीने देशाची सीमा पार करुन अवैधरित्या हिंदुस्थानात आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी आपण पश्चिम बंगालमधील रहिवाशी असल्याचे सांगुन, पुण्यातील रेडलाईट एरियामध्य वेश्या व्यवसायाचा मार्ग पत्करला होता. वेश्याव्यवसाय करुन, त्यांची उपजिवीका भागवित असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना ताब्यात घेउन, पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली.