Breking News
पुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीलाकोंढव्यात हुंड्यासाठी केला छळ, महिलेची आत्महत्यापुण्यात वेगवेगळ्या अपघातांत चौघांचा मृत्यूचारित्र्याच्या संशयावरुन तरुणीचा खून

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करंजे येथील विद्युत उपकेंद्राचे उद्घाटन

नवीन उपकेंद्रामुळे १ हजार ४१८ कृषी ग्राहकांना दिवसा विजेची सोय

marathinews24.com

बारामती – कृषी धोरण २०२० अंतर्गत ३३/११ केव्ही करंजे १० एमव्हीए क्षमतेच्या नूतन उपकेंद्राचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या उपकेंद्रामुळे परिसरातील १२ गावे-वाडीवस्त्यांवरील २ हजार ७३९ ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजसेवा उपलब्ध होणार आहे. त्यातील १ हजार ४१८ कृषी ग्राहकांना दिवसा वीजपुरवठ्याची सोय झाली आहे.

एस. सी. मधून आरक्षण न दिल्यास मंत्री, आमदार खासदारांचे कपडे धुणे बंद : धोबी समाजाचा निर्वाणीचा इशारा – सविस्तर बातमी

यावेळी महावितरणचे मुख्य अभियंता धर्मराज पेठकर, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी किशोर माने, अधीक्षक अभियंता दीपक लहामगे, प्रभारी कार्यकारी अभियंता सचिन कोरडे, कार्यकारी अभियंता (स्थापत्य) विजेंद्र मुळे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शंभाजी होळकर, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, करंजे गावचे सरपंच भाऊसाहेब हुंबरे यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

महावितरणकडून पायाभूत विद्युत सुविधांचे जाळे बळकट करण्यावर विविध योजनांच्या माध्यमातून भर देण्यात आला आहे. कृषी आकस्मिक निधीतील ६ कोटी ६५ लक्ष रुपये खर्चातून नव्याने उभारण्यात आलेल्या ३३/११ केव्ही करंजे उपकेंद्रात ५ एमव्हीए क्षमतेचे दोन पॉवर ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले आहेत. या उपकेंद्रासाठी १८ किलोमीटर ३३ व ११ केव्ही उच्चदाब विद्युत वाहिनी उभारण्यात आली आहे. त्यात ११ केव्ही शेंडकरवाडी, मगरवाडी, माळवाडी या तीन कृषी वाहिन्या (फिडर) व सोमय्या, करंजेपूल या दोन गावठाण वाहिन्यांचा समावेश आहे. यापूर्वी या परिसरातील गावांचा भार ३३/११ केव्ही निबूत, वडगाव, मुरुम व मुर्टी या उपकेंद्रावर विभागलेला होता.

आता या नवीन करंजे उपकेंद्रामुळे शेंडकरवाडी, गायकवाडमळा, सोरटेवाडी, करंजे, चौधरीवाडी, माळवाडी, भापकरमळा, करंजेपूल, दगडेवस्ती. मगरवाडी, नाईकवाडी, शिवबाबा मंदिर गावे व वाडीवस्त्यांवरील ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीज पुरवठा मिळणार आहे. त्यात घरगुती १ हजार १०८, वाणिज्य १९५ औद्योगिक १८ व कृषी १ हजार ४१८ अशा २ हजार ७३९ ग्राहकांना लाभ मिळणार आहे.

करंजेपुल ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन

याकार्यक्रमापूर्वी श्री. पवार यांच्या हस्ते करंजेपुल ग्रामपंचायत नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. २२ लाख रुपये खर्च करुन या इमारतीचे बांधकाम करण्यात आले असून ग्रामसचिवालय, सभागृह, स्वच्छतागृह आदी कामे करण्यात आली आहेत. उद्घाटनप्रसंगी गट विकास अधिकारी किशोर माने, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक शंभाजी होळकर, श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, सरपंच पूजा गायकवाड, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी सचिन लिंबरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×