Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

पोलीस शिपायाला मारहाण करणारा अटकेत

हत्यार हवेत फिरवत धमकी देणारा गजाआड

खराडीतील घटना

marathinews24.com

पुणे – पोलीस शिपायाला मारहाण करणाऱ्या तरुणाला खराडी पोलिसांनी अटक केली. पोलीस शिपायाला धक्काबुक्की करुन आरोपी तरुणाने गणवेश फाडला. सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच मारहाण केल्या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अक्षय अंगद लंगोटे (वय २८,रा. थिटे वस्ती, खराडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई अमोल जाधव यांनी खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

छायाचित्रामागची दृष्टी महत्वाची- डॉ. गो. बं. देगलूरकर – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील गंभीर गुन्हे रोखणे, तसेच गस्त घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून काॅप्स-२४ योजना सुरू करण्यात आली आहे. २५ सप्टेंबर राेजी रात्री साडेआठच्या सुमारास खराडी परिसरात आरोपी अक्षय लंगोटे हा एका महिलेला शिवीगाळ करत होता. या घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनंतर पोलीस शिपाई अमोल जाधव तेथे गेले.

त्यावेळी आरोपी लंगोटे हा एका महिलेला शिवीगाळ करत होता. पोलीस शिपाई जाधव यांनी महिलेला शिवीगाळ करु नको, असे सांगितले. लंगोटे यांना जाधव यांच्या कानशिलात लगावली. जाधव यांना धक्काबुक्की करुन गणवेश फाडला. त्यांच्याबरोबर असलेल्या गृहरक्षक दलातील जवानाला धक्काबुक्की केली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी लंगोटे याला अटक करण्यात आली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×