बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – प्रसिद्ध कंपनीची वितरण एजन्सी देण्याच्या आमिषाने बिबवेवाडी भागातील व्यावसायिकाची तब्बल २७ लाख १० हजार रुपयांची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध बिबवेवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाने केला तरूणीवर बलात्कार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारादर हे व्यावसायिक असून, बिबवेवाडी भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी १८ ऑगस्टला त्यांच्या मोबाइलवर मेसेज पाठविला होता. प्रसिद्ध खासगी कंपनीची वितरण एजन्सी देण्याचे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. त्यानंतर संदेशातील मोबाइल क्रमांकावर तक्रारदार व्यावसायिकाने संपर्क साधला. चोरट्यांनी वितरण एजन्सी देण्यासाठी सुरुवातीला काही रक्कम अनामत भरावी लागेल, असे सांगून त्यांना जाळ्यात ओढले.
सायबर चोरट्यांनी त्यांना बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. चोरट्यांच्या खात्यात महिनाभरात व्यावसायिकाने २७ लाख १० हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यानंतर चोरट्यांनी त्यांचे मोबाइल क्रमांक बंद केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर व्यावसायिकाने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक सूरज बेंद्रे तपास करत आहेत.
ऑनलानइन टास्कच्या आमिषाने तरुणीला गंडा; ५ लाख २८ हजारांची फसवणूक
पुणे – घरातून ऑनलाइन कामाची संधीचे (ऑनलाइन टास्क) आमिष दाखवनू सायबर चोरट्यांनी बाणेर भागातील तरुणीला ५ लाख २८ हजार रुपयांचा गंडा घातला आहे. ही घटना १६ सप्टेंबरला घडली असून, याप्रकरणी तरुणीने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार २४ वर्षीय तरुणी बाणेर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी १६ सप्टेंबरला तिच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी, असे आमिष दाखविले होते. त्यानंतर चोरट्यांशी तिने संपर्क साधला. सुरुवातीला चोरट्यांनी तिला एक काम दिले. ऑनलाइन पद्धतीने हे काम पूर्ण केल्यानंतर चोरट्यांनी तिाला पैसे दिले. पैसे मिळाल्याने तरुणीचा विश्वास बसला. त्यानंतर ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतवविल्यास चांगले पैसे मिळतील, असे आमिष दाखवले.
सायबर चोरट्यंनी तरुणीला जाळ्यात ओढले. तरुणीला चोरट्यांनी बँक खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. तरुणीने ५ लाख २८ हजार रुपये चोरट्यांच्या खात्यात जमा केले. त्यानंतर चोरट्यांनी तरुणीला काम दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने पोलिसंकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत तपास करत आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून उच्चशिक्षित हे सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकत असल्याचेही दिसून आले आहे.























