Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

मानीव अभिहस्तांतरण प्रकरणे-अभिनिर्णय पुर्व तपासणी अभियानाचे उद्घाटन

पहिल्याच दिवशी 30 संस्थांना मार्गदर्शन, 2 हजार 325 फ्लॅटधारकांना लाभ

marathinews24.com

पुणे – राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते “मानिव अभिहस्तांतरण प्रकरणे अभिनिर्णय पूर्व तपासणी” विशेष अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. या अभियानात 103 गृहनिर्माण संस्थांनी सहभाग नोंदविला असून पहिल्याच दिवशी 30 संस्थांची (2 हजार 325 सदनिका, दुकाने) प्रकरणे तपासून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सह नोंदणी महानिरीक्षक राजेंद्र मुठे, नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण, सह जिल्हा निबंधक वर्ग एक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर संतोष हिंगाणे, सह जिल्हा निबंधक पुणे ग्रामीण प्रविण देशपांडे उपस्थित होते.

सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत चित्रपट निर्मिती करा – गश्मीर महाजनी – सविस्तर बातमी

बिनवडे म्हणाले, विभागाच्यावतीने राबविण्यात आलेल्या ‘एक जिल्हा एक नोंदणी’, ‘सलोखा योजना’, ‘ई-प्रमाण, फेसलेस रजिस्ट्रेशन’ या सुविधा यशस्विरित्या अंमलबजावणी केली आहे. सह जिल्हा निबंधक पुणे शहरच्यावतीने राबविण्यात येणारे “मानिव अभिहस्तांतरण प्रकरणे-अभिनिर्णय पुर्व तपासणी” हे विशेष अभियान नागरिकाभिमुख असून अशा प्रकारचे उपक्रम स्वयंप्रेरणेने राबविणे हे कौतुकास्पद असल्याचे नमूद केले.

यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात अभियानात सहभागी संस्थांच्या वतीने शंकरकाया सोसायटी, म्हात्रे पुलाजवळ, कोथरूडच्या सभासदांनी राज्य शासन व विभागाचे आभार मानले.

शासनाच्या विविध विभागांतर्फे नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा गतिमान व सकारात्मकतेने दिल्या जाव्यात आणि लोकाभिमुख कामकाजाचे सुत्र अधिकाधिक अंगिकारले जावे, या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाअंतर्गत 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत सेवा पंधरवडा उपक्रम राबविण्यात येत आहे. सेवा उपक्रमाअंतर्गत सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी पुणे शहर कार्यालयाने सहकारी गृहरचना संस्थांची मानीव अभिहस्तांतरणाची प्रकरणे सत्वर निकाली काढण्याच्या उद्देशाने “मानिव अभिहस्तांतरण प्रकरणे अभिनिर्णय पूर्व तपासणी” विशेष अभियानाचे 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत आयोजन करण्यात आले. हिंगाणे यांनी या विशेष अभियानाचे स्वरुप, व्याप्ती आणि सर्व सामान्य नागरिकांना त्याचा कसा उपयोग होईल याबाबत माहिती दिली.

अभियानामध्ये अधिकाधिक गृहनिर्माण संस्थांनी सहभाग नोंदवावा. कार्यालयाचा jdr.punecity@gmail.com ईमेलवर ईमेल करावा. वाढता प्रतिसाद विचारात घेता दिवाळीनंतर अशाप्रकारचे शिबीराचे आयोजन करण्यात येईल असेही हिंगाणे यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×