Breking News
Pune Ganesh Visarjan : गणेश विसर्जन मुख्य मिरवणुकीत त्या मंडळाना पुन्हा संधीLokSamvad 2026 : ‘लोकसंवाद-२०२६’मधून पुणे मनपाच्या विविध योजनांची माहितीAyushman Bharat Card : आयुष्मान भारत कार्डचा नागरिकांनी लाभ घ्यावा – गणेश चव्हाणCaste Validity Certificate Pune : सेवा संकल्प अभियानांतर्गत जात वैधता प्रमाणपत्रासाठी विशेष शिबिरजिल्ह्यातील युवकांनी रोजगार मेळाव्यासह शासकीय योजनांचा लाभ घ्यावाPune Tax Fraud : पुण्यात ४ हजार ४२७ कोटींवर आयकर भरलाच नाहीBARTI Schemes Pune : ‘लोकसंवाद-२०२६’मधून बार्टीच्या योजनांची माहितीनांदेड सिटीतील आरोग्य शिबिरामध्ये ४०० जणांची तपासणीKoyta Case Pune : ऐन गणेशोत्सवात कोयता बाळगला, आरोपीला अटक‘सेवा संकल्प अभियान’च्या माध्यमातून आदिवासी बांधवांपर्यंत योजनांचा थेट लाभ पोहोचविण्याचा संकल्प

सेवा पंधरवडा अंतर्गत बारामतीच्या सुपा मंडळात शेतांसाठी ९६ नवे रस्ते

विभागीय आयुक्तांनी भेट देऊन केले कौतुक

marathinews24.com

पुणे – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित सेवा पंधरवड्यात बारामती तालुक्यातील सुपा मंडळाचे मंडळ अधिकारी हंसध्वज मनाळे आणि त्यांच्या सर्व ग्राम महसूल अधिकारी किंवा तलाठी यांच्या टीमने अतिशय उत्कृष्ट कामगिरी करत पाच दिवसांमध्ये नव्याने ९६ रस्ते करून दिले आहेत. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी आज मंडल अधिकारी कार्यालयास भेट देऊन त्यांचे कौतुक केले.

मानीव अभिहस्तांतरण प्रकरणे-अभिनिर्णय पुर्व तपासणी अभियानाचे उद्घाटन – सविस्तर बातमी

सेवा पंधरवडामध्ये पहिला टप्पा रस्ते उपलब्ध करून देण्याबाबत याबाबतीत होता. या पहिल्या टप्प्यांमध्ये सुपा मंडळ करेला अंतर्गत चांगले काम झाले आहे. आता या रस्त्यांची नोंद गाव नकाशावर आणि अधिकार अभिलेखांमध्ये घेण्यात येत आहे. हे काम अत्यंत प्रशंसनीय असल्यामुळे डॉ. पुलकुंडवार यांनी महसूल अधिकाऱ्यांचे कौतुक केले आणि गावकऱ्यांशी संवाद साधला. गावकऱ्यांनीदेखील याबाबत समाधान व्यक्त केलं.

मंडळ अधिकारी कार्यालय परिसरामध्ये यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी बारामतीचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×