Breking News
खूनाचा कट रचणारे टोळके गजाआडविशेष वृत्त ; साडेतीन हजार लक्ष रुपयाहून अधिक पुरक टंचाई आराखड्यास जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरीमहाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण नियामक मंडळ व वार्षिक सर्वसाधारण बैठक पुणे येथे संपन्नराज्यातील ९९ टक्के वीज ग्राहकांना ग्रीड सपोर्ट चार्ज नाही‘महाज्योती’च्या गुणवंतांचे यूपीएससी निकालात ‘शतक’; भारतीय वन सेवा परीक्षेत ८ विद्यार्थ्यांची बाजीआईच्या प्रियकराचा तरुणीच्या प्रियकराकडून खूनहंगाम सन २०२५ राज्यस्तरीय पिकस्पर्धेत पुणे जिल्ह्यातील ८ शेतकरी ‍विजेतेचाकसमान धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी समाधान शिबिर आयोजित करागॅसबील अपडेटच्या बहाण्याने घातला गंडाविद्यार्थ्यांनी ‘पुणे ॲग्री हॅकॅथॉन-२०२६’ स्पर्धेचा लाभ घ्यावा

पुण्यात खासदार मेधा कुलकर्णींनी बंद पाडला गरबा

तरूणाईला नासवणारा कार्यक्रम होउ देणार नाही

marathinews24.com

पुणे – नवरात्रोत्सवाची धामधुम सगळीकडे सुरू असतानाच खासदार मेधार कुलकर्णी यांनी कोथरूडमधील जीत मैदानावर धाव घेत थेट गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला. गरब्याच्या कार्यक्रमात आवाजाची मर्यादा ओलांडल्यामुळे संतप्त झालेल्या कुलकर्णी यांनी मैदानावर जाउन थेट गरब्याचा कार्यक्रम बंद पाडला. आवाजाच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या कार्यक्रमांवर पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे सनदशीर मार्गाने आपण हा कार्यक्रम बंद करीत असल्याचे सांगितले. तरूणाईला नासवणारा असला धांगडधिंगा होउ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

सेवा पंधरवडा अंतर्गत बारामतीच्या सुपा मंडळात शेतांसाठी ९६ नवे रस्ते – सविस्तर बातमी

कोथरूडमधील जीत मैदानावर शनिवारी दि.२७ गरब्याचे आयोजन केले होते. त्यावेळी आयोजकांकडून मो’्या आवाजात संगीत वाजवले जात होते. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांना प्रचंड त्रास झाल्यामुळे त्यांनी थेट खासदार मेधा कुलकर्णी यांना तक्रार केली. त्यानंतर आवाजामुळे संतापलेल्या खासदार कुलकर्णी यांनी मैदानावर धाव घेत थेट कार्यक्रमाचा ताबा घेत संगीत बंद पाडले. त्यामुळे परिसरात काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, पोलिसांनी संबंधिताविरूद्ध कारवाई न केल्यामुळे त्यांचे फावले असल्याचा आरोप मेधा कुलकर्णी यांनी केला आहे.

पुन्हा असले कार्यक्रम जीत मैदानात होऊ देणार नाही- मेधा कुलकर्णी

कोथरूडमध्ये’दरवर्षी या’ ठिकाणी धिंगाणा होत असून, आवाजाचा नागरिकांना खूप त्रास होतो. विविध आजाराने ग्रासलेले रूग्ण परिसरात असून, त्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. हे कसं सगळ्यांनी सहन करायचं? दरवर्षी इथं दहीहंडी होते. तरी सुद्धा घरातील आजी असेल, आजोबा असतील, लहान मुलं असतील, त्यांना त्रास सहन करावा लागतोय. आवाजाची मर्यादा न पाळल्याने हा कार्यक्रम इथून पुढे जीत ग्राऊंडवर होणार नाही’ आवाजाची आणि धार्मिकतेची बंधन ओलांडली आहे. त्यामुळे या पुढे या मैदानात असे कार्यक्रमात होऊ देणार नाही’, असं मेधा कुलकर्णी यांनी सांगितले. डीसीपी कदम यांना फोन केला, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनाही फोन केलाय. तरी आवाज पाळण्यासंदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे आम्हला सनदशीर मार्गाने हे करावं वाटलं. त्यामुळे इथून पुढे हा कार्यक्रम इथे होणार नाही. असेही त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×