घरफोडी करणारे चोरटे गजाआड

घरफोडी करणारे चोरटे गजाआड

चोरट्यांना पकडण्यासाठी १४४ ठिकाणचे चित्रीकरण तपासले

marathinews24.com

पुणे – घरफोडी करून पसार झालेल्या चोरट्यांना विमानतळ पोलिसांनी अटक केली. पसार झालेल्या चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी लोहगाव, दिघी, भोसरी, चऱ्होली भागातील १४४ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासले. चोरट्यांकडून ११ लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, दोन लॅपटॉप असा १४ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जय संजय मोहिते (वय २२, रा. भोसरी), आकाश सुधीर साळवी (वय २३, रा. दिघी), शुभम अशोक मडीवाळ (वय २०) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. महिलेने फिर्याद दिली होती.

तडीपारीत शहरात वावरणारा ताब्यात – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २३ सप्टेंबरला फिर्यादी महिलेच्या लोहगाव येथील सदनिकेतून चोरट्यांनी नऊ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लॅपटॉप चोरून नेले होते. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक मनोज बरूरे यांच्यासह पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरणाद्वारे तपास सुरू केला. लोहगाव, दिघी, चऱ्होली भागातील सीसीटीव्ही चित्रीकरण पोलिसांनी तपासले.

तपासात पसार झालेल्या चोरट्यांची माहिती पोलीस कर्मचारी योगेश थोपटे आणि ज्ञानदेव आवारी यांना मिळाली. तांत्रिक तपास करून पोलिसांनी तिघांना पकडले. त्यांच्याकडून दागिने, लॅपटाॅप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव, उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस कर्मचारी योगेश थोपटे, ज्ञानदेव आवारी, दादासाहेब बर्डे, शैलेश नाईक, अंकुश जोगदंडे यांच्यासह पथकाने ही कामगिरी केली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×