बेकादेशिरिरत्या फिरणाऱ्या सराईताला हडपसर पोिलसांनी घेतले ताब्यात
marathinews24.com
पुणे – तडीपार असताना देखील शहरात बेकादेशिरिरत्या फिरणाऱ्या सराईताला हडपसर पोिलसांनी ताब्यात घेतले. उमेश भरत ननवरे (वय २७ रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे ताब्यात घेण्यात आलेल्याचे नाव आहे. १० ऑक्टोबरला रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हडपसर येथील ब्रीज खालून ननवरेला ताब्यात घेण्यात आले.
उंड्रीत मोलकरणीचा दागिन्यावर डल्ला – सविस्तर बातमी
पोलिस शिपाई तुकाराम झुंजार यांनी तक्रार दिली आहे.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत अशाच पध्दतीने दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलेला सराईत वावरत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. स्वप्नील शंकर चिंचोले (वय २८, रा. गनराज चौक, कलवडवस्ती, लोहगाव) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. खंडणी विराेधी पथक दोनचे पोलिस शिपाई गणेश खरात खरात यांनी तक्रार दिली आहे. ११ ऑक्टोबरला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कलवड पीएमटी बस स्टॉप येथे कारवाई करण्यात आली.
मेफेड्रॉन बाळगणाऱ्या तिघांना अटक
मेफेड्रॉन बाळगल्या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करत एकाला अटक केली. त्यांच्याकडून ७ लाख ७ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शोएब शकील शेख (वय २३, रविवार पेठ, मिरा दातार दर्गा जवळ) याला अटक करण्यात आली आहे. आफाक अन्सार खान (वय २८, रा. रविवार पेठ) आणि मोईननईम खान (वय २७ रा. नानापेठ) या दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गणेश पेठेतील सासवडे सायकल मार्ट जवळ करण्यात आले. दरम्यान ३५ ग्रॅम जप्त करण्यात आला आहे.





















